Wedding Funny Video: लग्नासंबंधी अनेक मजेदार आणि हैराण करणारे व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. कधी लग्नातील भांडणं व्हायरल होतात, तर कधी नवरी-नवरदेवांचा डान्स. तर कधी ऐनवेळी त्यांच्यासोबत घडलेल्या काही गमतीदार गोष्टीही व्हायरल होत असतात. अनेकदा तर नवरदेवांसोबत असं काही घडतं की, लोक बघून हसून हसून लोटपोट होतात. असाच एक व्हिडीओ आम्ही तुमच्यासमोर आणत आहोत, जो बघून तुम्ही लोटपोट होऊन हसाल.
व्हायरल झालेल्या या व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, नवरी-नवरदेव एका मंदिरात लग्न करत आहेत. लग्नाचे रितीरिवाज पार पाडले जात आहेत. त्यानंतर नवरी-नवरदेव सप्तपदी घेण्यासाठी उभे राहतात. एक-दोन फेरे झाल्यावर अचानक नवरदेवाची लुंगी सुटते. अशात तो लगेच स्थिती सांभाळतो आणि लुंगी पुन्हा गुंडाळतो. अचानक घडलेला हा प्रकार पाहून तिथे असलेले लोक हसू लागतात. हा व्हिडीओ कुठला आहे हे समजू शकलेलं नाही, पण लोक हा व्हिडीओ बघून लोटपोट होत आहेत.
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @HasnaZaruriHai नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ३२ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर लोक यावर अनेक मजेदार कमेंट्स करत आहेत. एकानं लिहिलं की, 'असं कधी कधी होत असतं'. दुसऱ्यानं लिहिलं की, 'सगळं काही संपलं'. तिसऱ्यानं लिहिलं की, 'अब्रू लुटली गेली'.