फक्त बोटाने टिचकी मारुन याने कलिंगड कापलं, नेटकऱ्यांना प्रश्न पडला हे कसं शक्य आहे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2021 18:42 IST2021-10-04T18:40:58+5:302021-10-04T18:42:08+5:30
मोठं कलिंगड कापायचं म्हणजे सुरीही तशीच हवी पण एका व्हिडिओमध्ये चक्क चुटकी वाजवून कलिंगड कापण्यात आलंय. या पठ्ठ्याने चक्क बोटाच्या साहाय्याने कलिंगड कापलंय....

फक्त बोटाने टिचकी मारुन याने कलिंगड कापलं, नेटकऱ्यांना प्रश्न पडला हे कसं शक्य आहे?
कलिंगड अनेकांना आवडते. लाल रसरशीत कलिंदड म्हणजे खव्वयांचा जीव की प्राण पण कलिंगड घरी आणल्यावर त्याला कापण्यासाठी धारधार सुरी लागते. एवढ मोठं कलिंगड कापायचं म्हणजे सुरीही तशीच हवी पण एका व्हिडिओमध्ये चक्क चुटकी वाजवून कलिंगड कापण्यात आलंय. या पठ्ठ्याने चक्क बोटाच्या साहाय्याने कलिंगड कापलंय....
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एक टूथपिक कलिंगडामध्ये खुपसलंय. तसेच नंतर बोटांनी कलिंगडावर टिचकी वाजवली आहे. टिचकी मारताक्षणी कलिंगडाचे झाले आहेत. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे.
हा व्हिडीओ पाहून नेटकरी अवाक् झाले आहेत. माणसाने एका क्षणात टरबुजाचा तुकडे कसे काय केले ? असा प्रश्न लोकांना पडला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. तसेच काही नेटकऱ्यांनी तर हे अशक्य असल्याचं म्हटलं आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र त्याला yournaturegram या ट्विटर अकाऊंवटर शेअर करण्यात आले.