आरारारा खतरनाक! टायरमध्ये हवा भरता भरता अचानक फुटला आणि.....

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2020 11:37 IST2020-12-30T11:35:33+5:302020-12-30T11:37:11+5:30

अनेकदा तुम्ही टायरमध्ये हवा कशी भरली जाते हे पाहिलं असेल. पण टायरमध्ये जास्त हवा झाल्यावर नेमकं काय होतं हे पाहिलं नसेल.

watch worst Tire blast video goes viral on social media | आरारारा खतरनाक! टायरमध्ये हवा भरता भरता अचानक फुटला आणि.....

आरारारा खतरनाक! टायरमध्ये हवा भरता भरता अचानक फुटला आणि.....

जर तुम्ही कधी गाडीच्या टायरमध्ये हवा भरली असेल तर हा व्हिडीओ तुमच्यासाठी अधिक महत्वाचा आहे. कारण या व्हिडीओतून तुम्हाला शिकायलाही मिळेल. अनेकदा तुम्ही टायरमध्ये हवा कशी भरली जाते हे पाहिलं असेल. पण टायरमध्ये जास्त हवा झाल्यावर नेमकं काय होतं हे पाहिलं नसेल.

या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, दोन व्यक्ती मोठ्या टायरमध्ये हवा भरत आहेत. अशात टायरमध्ये हवा जास्त होते आणि टायर अचानक फुटतो. टायर इतक्या जोरात फुटतो की, आजूबाजूला असलेली दोन-तीन व्यक्ती थेट हवेत उडतात.

Derek या ट्विटर यूजरने हा व्हिडीओ शेअर केलाय. दोन व्यक्ती टायरमध्ये हवा भरत असताना टायर अचानक फुटतो आणि ते दोन व्यक्तीही हवेत उडून खाली पडतात. आजबाजूचे लोक हैराण होतात की, हे नेमकं काय झालं.

हा व्हिडीओ कुठला आहे हे समजू शकलेलं नाही. पण लोक हा व्हिडीओ बघून समजही घेत आहेत आणि हसतही आहेत. सुदैवाने यात कुणीही जखमी झालं नाही हे बरं झालं.
 

Web Title: watch worst Tire blast video goes viral on social media