किस करताना कपलसोबत असं काही झालं... व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 12:03 IST2019-04-19T11:45:47+5:302019-04-19T12:03:26+5:30
हा व्हिडीओ तुम्ही पाहिला तर, नक्कीच तुम्हालाही हसू आवरता येणार नाही.

किस करताना कपलसोबत असं काही झालं... व्हिडीओ व्हायरल
केरळ : सध्या प्री-वेडिंगचा ट्रेण्ड आहे, याच ट्रेण्डची लोकप्रियता सध्या वाढल्याचं दिसून येतं. लग्नाआधी प्री वेडिंग शूट करण्याची जोडीदारांसाठी एक फॅशनच बनली आहे. हल्ली वेगवगळ्या थिमवर प्री वेडिंग शूट करण्यात येतं. असाच एका जोडप्यानं शूट केलेला प्री वेडिंगच्या व्हिडीओनं सध्या सोशल मीडीयावर धुमाकूळ घातला आहे. हा व्हिडीओ तुम्ही पाहिला तर, नक्कीच तुम्हालाही हसू आवरता येणार नाही.
प्री वेडिंग शूट करण्यासाठी केरळमधील एक जोडपं नदीतील बोटीत बसून एकमेकांना किस करत होतं. त्यावेळी किस करताना त्यांची बोट उलटली आणि दोघंही नदीत पडले. हा त्यांचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फेसबुकवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला असून यावर अनेक लाईक्स, शेअर आणि कमेंट्स आल्या आहेत.
हा व्हायरल होणारा व्हिडीओ आहे, केरळमधील तिजिन आणि सिल्पा या जोडीचा. कडाम्मनिट्टा येथील पम्बा नदीत तिजिन आणि सिल्पा प्री वेडिंग शूट करत होते. या व्हिडीओत असं दिसतंय की, फोटोग्राफर त्यांना शूटबद्दल माहिती देत आहे, तसेच, या दोघांनी बोटीत बसल्यानंतर आपल्या डोक्यावर केळीचे धरले आहे. तर बाटीच्या बाजूला असलेले इतर पाणी उडवत आहेत. याचवेळी तिजिन आणि सिल्पा एकमेकांना किस करताना त्यांचा बोटीतील बॅलन्स सुटला आणि दोघंही नदीत पडले.
दरम्यान, तिजिन आणि सिल्पा यांच्या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच चार हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडीओसंदर्भात फोटोग्राफरनं एका वृत्तपत्राला सांगितलं की, प्री वेडिंग शूट करताना असं ठरवलेलं होतं. मात्र, याबाबत तिजिन व सिल्पा यांना सांगितलेलं नव्हतं. त्या दोघांचे नैसर्गिक भाव टिपाण्यासाठी असं करण्याची कल्पना डोक्यात होती.