आता बोला! 'या' तरूणीचा कारनामा पाहून तुम्ही चक्रावून जाल अन् स्वत:च्या कपाळावर मारून घ्याल हात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2021 14:48 IST2021-01-21T14:42:22+5:302021-01-21T14:48:04+5:30

हे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ती काही दिवसांपूर्वी मावशीसोबत फिरायला गेली होती. तिथे तिने १६४० फूट उंच या धबधब्यावर फोटो काढलेत.

Watch viral video of girl dangled over 1640ft waterfall | आता बोला! 'या' तरूणीचा कारनामा पाहून तुम्ही चक्रावून जाल अन् स्वत:च्या कपाळावर मारून घ्याल हात...

आता बोला! 'या' तरूणीचा कारनामा पाहून तुम्ही चक्रावून जाल अन् स्वत:च्या कपाळावर मारून घ्याल हात...

सोशल मीडियावर लाइक्स, कमेंट्सचा खेळ जरा जास्त वाढलाय. अनेकदा तर लोक यासाठी आपल्या जीवाचीही परवा करत नाहीत. Amairis Rose वय २५ वर्षे आहे. नुकताच तिने जगताली सर्वात मोठा धबधब्यावर फोटो काढला. हा फोटो पाहून लोकांची बोबडी वळली आहे. तिने Victoria Falls च्या किनाऱ्यावर लेटून फोटो काढला आणि तो इन्स्टावर शेअर केला.

तिने हे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ती काही दिवसांपूर्वी मावशीसोबत फिरायला गेली होती. तिथे तिने १६४० फूट उंच या धबधब्यावर फोटो काढलेत.

मेट्रोसोबत बोलताना रोज म्हणाली की, तिला हा कारनामा करताना अजिबात भीती वाटली नाही. उलट ती याकडे थरारक अनुभव म्हणून बघते. ती म्हणजे तिला फिरायला आवडतं आणि असं काही करून ती स्वत:ला कम्फर्ट झोनच्या बाहेर काढते.

रोजच्या या पोस्टला ४२ हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. अनेक यूजर्सनी तिच्यावर टीका केली आहे. एका यूजरने लिहिले की, 'तू या खतरनाक व्हिडीओला गंमत समजतीये का?'. तर दुसरा एक यूजर म्हणाला की, अशाप्रकारचे स्टंट इतर लोकांचा जीव धोक्यात घालू शकतात. 
 

Web Title: Watch viral video of girl dangled over 1640ft waterfall