Video : सर्कसमधील सिंहाने रिंगमास्टरवर केला हल्ला, पब्लिकने केला कल्ला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 17:45 IST2019-04-05T16:57:32+5:302019-04-05T17:45:24+5:30
एका सर्कसमधील हा व्हिडीओ असून सर्कस सुरू होती.

Video : सर्कसमधील सिंहाने रिंगमास्टरवर केला हल्ला, पब्लिकने केला कल्ला!
यूक्रेनचा एका धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. एका सर्कसमधील हा व्हिडीओ असून सर्कस सुरू होती. सिंह त्यांचे कर्तब दाखवत होते. रिंगमास्टर समोरच उभा होता. दरम्यान एका सिंहाने रिंगमास्टरवर अचानक अटॅक केला आणि प्रेक्षक घाबरून ओरडू लागले होते.
सोशल मीडियावर हे दोन्ही व्हिडीओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाले आहेत. Lugansk State Circus चा रिंगमास्टर Hamada Kouta वर सिंहाने अटॅक केला होता. सध्या तो ठिक आहे. त्याच्या खांद्याला आणि हाताला जरा इजा झाली आहे.
त्याने मीडियाला सांगितले की, सिंहाचा जेव्हा मूड चांगला नसतो तेव्हा ते असे करत असतात. या व्हिडीओमध्ये लोकांच्या ओरडण्याचा आवाज ऐकू येत आहे.