Watch Russian youtuber sets Mercedes car on fire viral video | आता बोला! यूट्यूबरने पेटवून दिली १ कोटीची नवी कोरी लक्झरी कार, व्हिडीओ झाला व्हायरल....

आता बोला! यूट्यूबरने पेटवून दिली १ कोटीची नवी कोरी लक्झरी कार, व्हिडीओ झाला व्हायरल....

मर्सिडीज कार घेणं अनेकांचं स्वप्न असतं. ज्यांनी ही कार घेतली ते लोक कारला तळहाताच्या फोडासारखं जपतात. पण एका रशियन यूट्यूबरने १ कोटी रूपयांची मर्सिडीज कार पेटवून दिली. त्याच्या या कारनाम्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या यूट्यूबरचं नाव Misha किंवा Mikhail Litvin असं आहे. त्याचे यूट्यूबवर ५० लाखांपेक्षा अधिक सब्सक्राइब्स आहेत. तर इन्स्टाग्रामवर ११.३ मिलियन फॉलोअर्स आहेत. त्याने त्याची १५०,००० डॉलरची मर्सिडीज GT 63s कार जाळून ट्रेंडीग टॉपिक ठरला आहे. 

हा व्हिडीओ २४ ऑक्टोबरला यूट्यूबवर शेअर करण्यात आला. ज्याला आतापर्यंत ११,३६६,५५६ व्ह्यूज मिळाले आहेत आणि १० लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. इतकेच नाही तर ४७ हजार लोकांनी याला डिसलाइकही केलं आहे. हा व्हिडीओ शेअर करत यूट्यूबरने लिहिले की, 'मी फार विचार केला की, मी या शार्कसोबत काय करायला हवं...माझ्यासाठी आग चांगली आयडिया होती. मी आनंदी नाही'.

हा व्हिडीओ पाहून अनेक लोक म्हणाले की, यूट्यूबरने हे केवळ फॉलोअर्स वाढवण्यासाठी केलं. तर एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, यूट्यूबरला मर्सिडीजच्या या महागड्या मॉडलबाबत काही समस्या होत होत्या. कार स्थानिक मर्सिडीज डीलरकडे पाच वेळा पाठवण्यात आली. पण त्याने कथितपणे कार ठीक करण्यास नकार दिला.

व्हिडीओत बघू शकता की, यूट्यूबरने नवीनच दिसणारी मर्सिडीज मैदानात उभी केली. त्याने डिक्कीतून तेलाच्या कॅन काढल्या आणि एक-एक करून गाडीवर ओतल्या. नंतर काही अंतरावर जाऊन तो आगीवर सॉसेजेस शिजवतो. नंतर पेटलेलं लायटर गवतावर टाकतो. आग गवताच्या माध्यमातून मर्सिडीजपर्यंत पोहचते आणि पेट घेते. काही मिनिटात लक्झरी कार जळून राख होते.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Watch Russian youtuber sets Mercedes car on fire viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.