Virat Kohli चे अकाउंट बंद पडल्याने 'इंस्टाग्राम'ला 70 लाखांचा फटका; नेमकं काय झालं..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 17:47 IST2026-01-30T17:46:25+5:302026-01-30T17:47:14+5:30

Virat Kohli Instagram: विराट कोहलीचे पहाटे अचानक इंस्टाग्राम अकाउंट बंद पडले होते.

Virat Kohli's account was closed, causing a loss of 70 lakhs to Instagram; What exactly happened? | Virat Kohli चे अकाउंट बंद पडल्याने 'इंस्टाग्राम'ला 70 लाखांचा फटका; नेमकं काय झालं..?

Virat Kohli चे अकाउंट बंद पडल्याने 'इंस्टाग्राम'ला 70 लाखांचा फटका; नेमकं काय झालं..?

Virat Kohli Instagram Row: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीचे इंस्टाग्राम अकाउंट अचानक बंद पडल्यामुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली. शुक्रवारी (30 जानेवारी) पहाटे कोहलीचे इंस्टाग्राम प्रोफाइल अचानक दिसेनासे झाल्याने चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. विराटने सोशल मीडियातून अचानक संन्यास घेतल्याचा अंदाजही अनेकांनी लावला. मात्र काही वेळातच कोहलीचे अकाउंट पुन्हा सक्रिय झाले आणि चर्चांना पूर्णविराम मिळाला.

70 लाख फॉलोअर्स गमावल्याचा दावा व्हायरल

दरम्यान, कोहलीचे अकाउंट पुन्हा दिसू लागल्यानंतर सोशल मीडियावर आणखी एक दावा वेगाने व्हायरल होत आहे. या दाव्यानुसार, कोहलीचे अकाउंट बंद होताच इंस्टाग्रामला अवघ्या एका तासात 70 लाख (7 मिलियन) फॉलोअर्सचा फटका बसला. काही व्हायरल पोस्ट्स आणि स्क्रीनशॉट्समध्ये असे दाखवण्यात आले की, इंस्टाग्रामचे फॉलोअर्स 705 मिलियनवरून थेट 698 मिलियनवर आले. कोहलीच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त करत इंस्टाग्रामला ‘अनफॉलो’ केल्याचे बोलले जात आहे. मात्र, या दाव्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही.

इंस्टाग्रामचे अधिकृत फॉलोअर्स किती?

महत्त्वाची बाब म्हणजे, Instagram हेच प्लॅटफॉर्मवरील सर्वाधिक फॉलो केलेले अकाउंट आहे. ही बातमी लिहेपर्यंत इंस्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटला सुमारे 698 मिलियन फॉलोअर्स होते. फॉलोअर्सच्या आकड्यातील चढ-उतार हे वेळोवेळी होत असतात आणि ते एखाद्या एकाच घटनेशी थेट जोडता येत नाहीत, असे सोशल मीडिया तज्ज्ञांचे मत आहे.

सर्वाधिक फॉलो केलेला क्रिकेटर

विराट कोहली हे इंस्टाग्रामवर जगातील सर्वाधिक फॉलो केलेले क्रिकेटपटू आहेत. विराट कोहलीचे इंस्टाग्रामवर 274 मिलियन फॉलोअर्स आहेत, तर दुसऱ्या नंबरला सचिन तेंडुलकर आहे. त्यांचे 51 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. या दोघांमध्ये सुमारे 222 मिलियन फॉलोअर्सचा फरक आहे, जो कोहलीची सोशल मीडियावरील प्रचंड लोकप्रियता दाखवतो.

Web Title : विराट कोहली का अकाउंट बंद होने से इंस्टाग्राम को लाखों का नुकसान

Web Summary : विराट कोहली का इंस्टाग्राम अकाउंट कुछ समय के लिए बंद हो गया, जिससे अफवाहें उड़ीं। वापस आने पर, दावा किया गया कि इंस्टाग्राम ने 7 मिलियन फॉलोअर्स खो दिए। आधिकारिक पुष्टि नहीं हुई है, लेकिन कोहली 274 मिलियन फॉलोअर्स के साथ सबसे अधिक फॉलो किए जाने वाले क्रिकेटर बने हुए हैं।

Web Title : Virat Kohli's Account Closure: Instagram Loses Millions of Followers

Web Summary : Virat Kohli's Instagram account briefly disappeared, sparking rumors. When it returned, claims circulated that Instagram lost 7 million followers. Official confirmation is lacking, but Kohli remains the most followed cricketer with 274 million followers.