Viral Video: लग्नाआधी तरुणी एक्स बॉयफ्रेंडला जाऊन भेटली, व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल; पण गोष्ट खरी आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 09:16 IST2025-12-15T09:13:30+5:302025-12-15T09:16:37+5:30
Girl meets Ex boyfriend before marriage Video Viral: तुम्ही सोशल मीडियावर असाल, तर हा व्हिडीओ तुम्हालाही दिसला असेल. सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओची खरी गोष्ट आता समोर आली आहे.

Viral Video: लग्नाआधी तरुणी एक्स बॉयफ्रेंडला जाऊन भेटली, व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल; पण गोष्ट खरी आहे का?
Girl meets her Ex boyfriend before Marriage: नवरीच्या वेशभूषेत असलेली एक तरुणी कारमधून उतरते आणि थोडं दूर चालत जाऊन एका तरुणाला भेटते. याचा कारमध्ये बसलेला तिचा मित्र व्हिडीओ शूट करतो. लग्नाला दोन तास वेळ असताना ही तरुणी तिच्या एक्स बॉयफ्रेंडला भेटायला आल्याचे तो बोलत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर आला आणि तुफान व्हायरल झाला. अनेकांनी यावरून त्या तरुणीवर टीकेचा भडिमार केला. पण, या व्हिडीओची खरी गोष्ट काय आहे?
लग्नाच्या मंडपात जाण्याऐवजी ही तरुणी तिच्या एक्स बॉयफ्रेंडला भेटायला आली आहे. लग्न दोन तासांवर असताना तिला एक्स बॉयफ्रेंडला भेटावं वाटतंय, म्हणजे तिच्या मनात त्यांच्याबद्दल प्रेम आहे, अशा आशयाच्या पोस्ट करत अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.
लग्नाआधी तरुणी एक्स बॉयफ्रेंडला भेटली, व्हिडीओ पहा
जो व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. तरुणी कारमधून उतरते आणि त्याला भेटायला जाते. आल्यानंतर कारमध्ये बसते आणि तिला अश्रू अनावर होतात.
She is getting married but still went to meet her ex boyfriend.
— ︎ ︎venom (@venom1s) December 13, 2025
There are many such cases in society where girls meet their ex before marriage and some even after marriage.
The past always matters. pic.twitter.com/OiHq91bhpz
या व्हिडीओबद्दलची खरी माहिती काय?
लोकांचं लक्ष वेधून घेणारा हा व्हिडीओ खरा वाटत असला, तरी ही घटना खरी नाहीये. हा व्हिडीओ सोशल मीडिया इन्फ्लुअन्सरने तयार करण्यात आलेला आहे.

हा व्हिडीओ AARAV MAAVI या यूजरने त्याच्या @chaltePhirte098 या सोशल मीडिया हॅण्डलवर शेअर केला होता. आरव अशाच पद्धतीचे व्हिडीओ बनवतो.
सोशल मीडिया पर कब क्या हिट हो जाए कहा नही जा सकता। 2 दिन से एक स्क्रिपटेड वीडियो वायरल हो रही है ... जिसमे दावा किया जा रहा है.. दुल्हन शादी के मंडप मे जाने से पहले अपने बॉयफ्रेंड से अंतिम बार मिलने क़ो रास्ते मे रुकी है। उसके दोस्त ने वीडियो बनाकर वायरल किया है।
— TRUE STORY (@TrueStoryUP) December 14, 2025
जबकि वीडियो मे… pic.twitter.com/kZR38iu9nX
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकजण ही घटना खरी असल्याचे समजून तो शेअर करत आहेत. पण हा व्हिडीओ बनवण्यात आला असून, आतापर्यंत ४८.४ मिलियन पेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.