शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 11:26 IST

Viral Video news : हा व्हिडीओ बघून या रस्त्यावरून ये-जा करणे खरंच सुरक्षित आहे का? असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. वीजेचा टॉवर आहे आणि त्यातूनच वाहने या करताहेत. हा रस्ता आहे बंगळुरूतील. 

Viral Videos Today: एका व्यक्तीने मध्य प्रदेशातील रस्त्याचा व्हिडीओ पोस्ट केला. महापालिकेच्या अभियंत्यांच्या बुद्धीची टिंगल उडवणाऱ्या या व्हिडीओला उत्तर देताना एका व्यक्तीने बंगळुरूतील रस्त्याचा व्हिडीओ दाखवला. बंगळुरूतील मास्टरपीस म्हणत त्याने व्हिडीओ पोस्ट केला; हा व्हिडीओ बघून बघणाऱ्यांनाही प्रश्न पडेल की, या रस्त्यावरून जाणे खरंच सुरक्षित आहे का?

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

पुनीत नावाच्या व्यक्तीने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. एका यूजरने मध्य प्रदेशातील रस्त्याचा व्हिडीओ पोस्ट केला होता, त्यावर व्यक्त होताना पुनीतने रस्त्याचा हा नमुना दाखवला. 

झालं असं की मध्य प्रदेशातील सतना नगरपालिकेकडून सिमेंटचा रस्ता बनवण्यात आला. पण, काम करताना रस्त्याच्या मध्ये असलेला विजेचा खांब आणि रोहित्र हटवण्यातच आले नाही. मध्य प्रदेशातील भ्रष्टाचार आणि नगर नियोजन कुठल्या थराला गेलंय, पण कुणीही याबद्दल बोलत नाही, असे त्या यूजरने म्हटले. 

बंगळुरूतील रस्त्याचा व्हिडीओ 

त्यावर पुनीत नावाच्या व्यक्तीने बंगळुरूतील एका रस्त्याचा व्हिडीओ शेअर केला. हा रस्ता आहे बंगळुरूतील हेब्बर परिसरातील. रस्त्याच्या अगदी मधोमध हा उच्च दाब वाहिनीचा खांब आहे. धोकादायक म्हणजे या खांबाच्या मधून वाहने येत-जात असतात.

बंगळुरूतील मास्टरपीस

हा व्हिडीओ शेअर करताना यूजर म्हणाला की, मला तुम्हाला बंगळुरूतील मास्टरपीस दाखवायचा आहे. हा व्हिडीओ बघून लोकांनी कमेंट्स करत मिश्कील भाषेत कामाचे वाभाडेच काढले आहे. 

एका यूजरने म्हटले आहे की, आधी खंबा आला की, रस्ता. याला जबाबदार कोण आहे, शोधलं पाहिजे. 

दुसऱ्या एका व्यक्तीने म्हटले आहे की, बंगळुरूतील आयफेल टॉवर आहे. तर आणखी एका यूजरने म्हटले, याचे उत्तर आहे भ्रष्टाचार. 

टॅग्स :Viral Videoव्हायरल व्हिडिओSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलBengaluruबेंगळूरTwitterट्विटर