Viral Video : फोटो काढत होती महिला, तेव्हाच १८० च्या स्पीडने जिराफ लागला मागे आणि मग..
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2021 16:18 IST2021-06-24T16:17:07+5:302021-06-24T16:18:56+5:30
एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात एक महिला दुरूनचं एका भव्य जिराफाचा कॅमेराने फोटो काढण्याचा प्रयत्न करत असते.

Viral Video : फोटो काढत होती महिला, तेव्हाच १८० च्या स्पीडने जिराफ लागला मागे आणि मग..
जंगलाची सफारी करण्याचा आनंद प्रत्येकाला घेता येत नाही. पण जे लोक जंगलात जाऊन प्राण्यांना बघतात ते त्यांचे फोटो काढण्यापासून स्वत:ला रोखू शकत नाहीत. जास्तीत जास्त लोक जंगला सफारीवर आपले कॅमेरे सोबत घेऊन जातात आणि प्राण्यांना कॅमेरात कैद करण्याचा पूर्ण प्रयत्न करतात. इतकंच नाही तर हे फोटो काढण्यासाठी लोक कोणतीही रिस्क घ्यायला तयार असतात.
असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात एक महिला दुरूनचं एका भव्य जिराफाचा कॅमेराने फोटो काढण्याचा प्रयत्न करत असते. पण तिला याचा जराही अंदाज नव्हता की, जिराफचा फोटो काढणं तिला आणि गाडी तिच्यासोबत असलेल्या व्यक्तीसाठी महागात पडू शकतं. काही सेकंदातच महिलेच्या लक्षात आलं की, जंगलात सफारी करणं इतकंही सोपं नसतं जेवढं समजलं जातं. (हे पण बघा : Viral Video : आंघोळ करत होती तरूणी, तेव्हाच असं काही घडलं की ती जोरात ओरडायला लागली!)
जिराफ महिला आणि तिची पाहिल्यावर त्यांचा पाठलाग करू लागतो. जिराफ इतक्या वेगाने गाडी पाठलाग करतो की, महिला चांगलीच घाबरते. गाडी वेगाने पळवूनही जिराफ त्यांच्या जवळ पोहोचतो. काही वेळाने जिराफाने धावणं थांबवलं. पण हा अनुभव महिलेसाठी खरंच खतरनाक होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.