Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 22:25 IST2025-06-20T22:23:59+5:302025-06-20T22:25:54+5:30

एका कारच्या मागील काचेवर एक डिजिटल बोर्ड लावण्यात आला आहे, ज्यावर अशी काही सूचना लिहून येत आहे की, ती वाचून लोकांनी खूप मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Viral Video: Wife's fear is different! Patthya puts 'Asa' board on the car, you will be speechless after seeing it | Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  

Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  

सध्या बाजारात गाड्यांसाठी नवनवीन ॲक्सेसरीज येत आहेत, ज्यांचा वापर लोक इतक्या हटके पद्धतीने करत आहेत की, इंटरनेटवर त्यांचे व्हिडीओ पाहून सारेच थक्क होत आहेत. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यात एका व्यक्तीने आपल्या गाडीच्या मागच्या बाजूला 'इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले पॅनल' लावून एक अत्यंत अनोखी सूचना लिहिली आहे, जी वाचून अनेकांना हसू आवरता येत नाहीये.

आपल्याला माहीत आहे, गाडीला थोडा जरी धक्का लागला किंवा ती घासली गेली, तरी रस्त्यावर लगेच महाभारत सुरू होते. लोकांचे वाद इतके वाढतात की, रागाच्या भरात ते एकमेकांवर बंदूकही रोखायला मागेपुढे पाहत नाहीत. 'रोड रेज'चे असे अनेक व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. पण यावेळी जो व्हिडीओ व्हायरल होत आहे, तो थोडा वेगळा आहे.

या व्हायरल क्लिपमध्ये रोड रेज नाही, तर एका नवऱ्याने केलेली अनोखी विनंती आहे. एका कारच्या मागील काचेवर एक डिजिटल बोर्ड लावण्यात आला आहे, ज्यावर अशी काही सूचना लिहून येत आहे की, ती वाचून कमेंट सेक्शनमध्ये लोकांनी खूप मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

डिस्प्लेवरील 'ती' खास चेतावणी!
या व्हायरल व्हिडीओमध्ये, ट्रॅफिकमध्ये उभ्या असलेल्या या कारच्या चालकाने मागील काचेवर 'इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले पॅनल' लावले आहे, ज्यावर सर्वात आधी, "कृपया अंतर ठेवा... अंतर ठेवा" असे लिहून येते. आणि त्यानंतर पुढे, "कारला धक्का लागला तर बायको मला मारेल!" असे लिहून येते. या वाक्याच्या शेवटी डोळ्यातून अश्रू वाहत असल्याची इमोजी देखील वापरली गेली आहे, ज्यामुळे नवऱ्याची ही अनोखी विनंती अधिकच बोलकी वाटते.


व्हिडीओ व्हायरल, लाखो व्ह्यूज!
हा व्हिडीओ इन्स्टाग्राम हँडल 'trippi_twenty'ने शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "या भावाला आज मार खावा लागला आहे वाटतं". या पोस्टला ३ लाखांहून अधिक लाईक्स आणि ९० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर दीड हजारांहून अधिक युजर्सनी कमेंट्स केल्या आहेत.

एका युजरने लिहिले, "भय इथले संपत नाही, पण हे पण चांगले आहे." तर दुसऱ्याने लिहिले, "ब्लू ड्रम तयार आहे वाटतं." तिसऱ्या युजरने "नंबर प्लेट तर कमाल आहे!" अशी प्रतिक्रिया दिली. तर काही युजर्सनी तर "काय भाऊ... हुंड्याची कार आहे का?" असेही मजेशीर प्रश्न विचारले आहेत.

Web Title: Viral Video: Wife's fear is different! Patthya puts 'Asa' board on the car, you will be speechless after seeing it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.