Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 10:25 IST2025-07-07T10:25:18+5:302025-07-07T10:25:41+5:30
व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये दिसतं की, नवरा आणि नवरी खुर्चीवर बसले आहेत. तेवढ्यात नवरीच्या घरचे काही लोक येतात आणि...

Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच
प्रत्येक लग्नसमारंभात असे काही खास क्षण असतात की, ते सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. सध्या असाच एक मजेशीर व्हिडीओ इंटरनेटवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओमध्ये ‘जूता चुराई’ म्हणजेच नवऱ्याच्या बूट चोरण्याच्या या विधीत एकदम हटके आणि धम्माल ट्वीस्ट आला आहे.
बूटासाठी नवऱ्याला लोळवला!
भारतीय लग्नांमध्ये नवऱ्याचे बूट लपवण्याची एक मजेशीर अलिखित विधी आहे. यात नवरीच्या घरचे लोक नवरदेवाचे बूट चोरतात आणि त्याच्या बदल्यात पैशांची मागणी करतात. पण, या व्हिडीओत असा काही धांगडधिंगा आणि गदारोळ पाहायला मिळाला, की तो पाहून लोकांना हा विधीच अतरंगी वाटू लागला आहे. या व्हिडीओमध्ये बूट चोरण्यासाठी नवऱ्याला अक्षरश: जमिनीवर लोळवलं आहे.
काय झालं बघाच!
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये दिसतं की, नवरा आणि नवरी खुर्चीवर बसले आहेत. तेवढ्यात नवरीच्या घरचे काही लोक येतात आणि नवऱ्याला थेट खाली झोपवतात. मग काय, सगळे एकत्र येऊन त्याचे बूट काढण्याचा प्रयत्न सुरू करतात. या गदारोळात बिचारा नवरा चक्क जमिनीवर आडवा झाला आहे आणि त्याची ही अवस्था बघून नवरीसह सगळे पाहुणे हसून लोटपोट झाले आहेत.
एका लग्नातील हा धमाल व्हिडीओ इंस्टाग्रामवर 'sgpranchi' या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिलं असून, हजारो लोकांनी लाईक केलं आहे. कमेंट्समध्ये यूजर्सनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलं की, “इथे तर नवऱ्यासोबतच गेम झाला”. तर, दुसऱ्याने मस्करीत म्हटलं की, “हे खरंच मुलीचे नातेवाईक आहेत की डाकूंचं घराणं?” हा व्हिडीओ पाहून सगळेच हे ननकी म्हणतायत की, भारतीय लग्नांमध्ये धमाल, मस्ती आणि थोडी कुस्ती ही हमखास असते.