लग्न सोहळे म्हटलं की, नाचगाणं, धमाल आणि विविध कार्यक्रम यांची रेलचेल असते. पण याच नाच-गाणं, धमाल-मस्तीमध्ये कधीकधी असे काही प्रसंग घडतात, जे पाहून अख्खी वरात थक्क होऊन जाते. सध्या सोशल मीडियावर असाच तुफान व्हायरल होत असलेला एक व्हिडीओ चर्चेचा विषय बनला आहे. या व्हिडीओमध्ये एका नवरदेवाने असं काहीतरी केलंय, जे पाहून कुणालाही धक्का बसेल.
नवरदेवाने ऑर्केस्ट्रा डान्सरच्या गळ्यात घातला हार!लग्नाच्या मंडपातील सारे विधी पूर्ण झाले होते, स्टेजवर ऑर्केस्ट्रा सुरू होता, वातावरणात उत्साह होता आणि नवरदेव मनसोक्त नाचत होता. पण त्याचवेळी त्याने असं काहीतरी केलं की, वधूपक्षासोबतच वऱ्हाडी मंडळीही अवाक् झाली. डान्स करत असताना हा नवरदेव फक्त ऑर्केस्ट्रा डान्सरसोबत थिरकलाच नाही, तर त्याने जे काही केले ते तर व्हायरल होण्यासाठीच बनवले असावे. नाचता नाचता त्याने आपल्या गळ्यातील वरमाला काढली आणि त्या नाचणाऱ्या मुलीच्या गळ्यात घातली.
हा प्रसंग पाहून संपूर्ण वरातीत एकच गडबड उडाली. लोक हसू लागले, मोबाईल कॅमेरे सुरू झाले आणि मग कथेला एक नवीन ट्विस्ट आला. हा व्हिडीओ इतका व्हायरल झाला आहे की, लोक विचारत आहेत, "हे लग्न होतं की एखाद्या चित्रपटातील सीन?"
ऑर्केस्ट्रा डान्सरनेही लाजून केले 'कांड'नवरदेवाने माळ घातल्यानंतर ऑर्केस्ट्रा डान्सर सुरुवातीला स्तब्ध झाली. हा विनोद आहे की खरं, हे तिला काही सेकंद कळेना. पण जेव्हा नवरदेव लाजत हसला आणि हात जोडले, तेव्हा संपूर्ण वातावरणच बदलले. त्या मुलीनेही या खेळात सहभाग घेतला. तिनेही आपल्या गळ्यातील माळ काढली आणि लाजत लाजत नवरदेवाच्या गळ्यात घातली.
नेटकऱ्यांनीही घेतली भरभरून मजा!यानंतर तर उपस्थितांच्या शिट्ट्या, हशा आणि मोबाईल कॅमेऱ्यांच्या फ्लॅशलाईट्सचा आवाज घुमू लागला. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, दोघे पुन्हा नाचू लागतात, जणूकाही लग्न नव्हे, तर दुसरा वरमाला समारंभ सुरू आहे.
या व्हिडीओवर इंटरनेटवरील जनता जोरदार प्रतिक्रिया देत आहे. कोणी म्हणत आहे की, "नवरदेव गेला आता कामातून", तर कोणी कमेंट करत लिहिले की, "भाभी नंबर टू एंटर द चॅट". हा व्हिडीओ कोणत्या राज्यातील आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण, या व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.