नैसर्गिक अधिवासाचा नाश, शिकार आणि अन्नाची कमतरता, मानवी वस्तींच्या आसपास असलेले जंगल यांसारख्या कारणांमुळे जंगली प्राण्यांचा मानवी वस्तींमध्ये वावर वाढल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. दरम्यान, एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे, ज्यात एक व्यक्ती शौचालयासाठी जात असताना अचानक त्याच्यासमोर बिबट्या येतो. बिबट्याला पाहून तो प्रचंड घाबरतो आणि स्वत:चा जीव वाचण्यासाठी जोरजोरात ओरडतो. त्यानंतर पुढे जे घडते, त्यावर कोणालाही विश्वास बसणार नाही. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या गंमतीशीर प्रतिक्रिया येत आहेत.
संबंधित व्यक्ती पहारेकरी असल्याची माहिती समोर आली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहे की, पहारेकरी मध्यरात्री शौचालयासाठी बाहेर पडतो. पहारेकरी शौचालयात जात असताना त्याला कुत्र्यांचा भुकण्याचा आवाज येतो. परंतु, पहारेकरी त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो आणि पुढे चालत जातो. परंतु, पुढे गेल्यानंतर बिबट्याला पाहून त्याच्या अंगाचा थरकाप उडतो. स्वत:चा जीव वाचवण्यासाठी तो जोरजोरात ओरडतो आणि तिथून मागे धावत येतो. परंतु, पुढे घडलेली घटना हास्यपद आहे. त्या व्यक्तीचा आवाज ऐकून स्वत: बिबट्याच घाबरून तिथून पळून जातो.
हा व्हिडिओ कमल नसित यांनी @nasitkamal नावाच्या अकाउंटवरून अपलोड केल्यानंतर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला. आतापर्यंत जवळपास ४६ लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तसेच या व्हिडीओवर हजारो लोकांनी कमेंट केल्या आहेत. या व्हिडिओची सर्वात मजेदार गोष्ट म्हणजे सुरुवात भयानक आहे, पण शेवट खूपच मजेदार आहे.