Viral video : Viral video of buffalo and lion goes viral on social media | Viral video : बाबो! शिंगावर उचलत 5 सेकंदात सिंहाला म्हशीनं चितपट केलं; व्हिडीओ पाहाल तर डोळे उघडेच राहतील

Viral video : बाबो! शिंगावर उचलत 5 सेकंदात सिंहाला म्हशीनं चितपट केलं; व्हिडीओ पाहाल तर डोळे उघडेच राहतील

सोशल मीडियावर प्राण्याचे वेगवगवेगळे व्हिडीओज आणि फोटोज व्हायरल होत असतात. मागच्या वर्षापासून लॉकडाऊन लागल्यानंतर प्राण्याचे दुर्मिळ व्हिडीओसुद्धा सगळ्यांना पाहायला मिळाले. सध्या जंगलाचा राजा म्हणवल्या जाणाऱ्या सिंहाच्या फजितीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. एका रानम्हैशीने सिंहाला आपल्या शिंगानी चितपट केले आहे. (viral video of Buffalo and Lion goes viral on Social Media)

जंगलाचा राजा म्हटलं की, भल्याभल्यांचा थरकाप उडतो. सिंहापासून सगळेचजण लांब पळण्याचा प्रयत्न करतात. इथे मात्र सिंह एका रानम्हशीची शिकार करण्याच्या बेतात असताना, अचानक दुसरी म्हैस आल्याने या सिंहाला चांगलीच शिक्षा मिळाली आहे.  व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे खाली बसलेल्या एका म्हशीची शिकार करत असताना, सिंहावर दुसरी एक म्हैस चालून आलेली दिसते.

या म्हशीने थेट हल्ला करुन आपल्या शिंगाच्या सहाय्याने सिंहाला चितपट केले आहे. आपल्या शिंगावर उचलत या म्हशीने सिंहाला हवेत फेकल्याचे दिसून येईल. तसेच, पुन्हा एकदा शिंगावर उचलत सिंहाला या म्हशीने खाली आदळलं आहे. सोशल डिस्टेंसिंगपासून वाचण्यासाठी पठ्ठ्यानं शोधला जुगाड; फोटो पाहून आनंद महिंद्रा म्हणाले.. 

the Dark side of nature नावाच्या एका ट्विटर अकाऊंटवर अपलोड करण्यात आला आहे. आतापर्यंत १ हजारापेक्षा जास्त लोकांना हा  व्हिडीओ लाईक केला आहे. आतापर्यंत  ७६ हजारापेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. अनेकांनी असा व्हिडीओ याआधी कधीही पाहिला नसेल. सिंहाची झालेली फजिती पाहून अनेकांनी गमतीदार कमेंट्स केल्या आहेत. नोकरीवरून काढलं; म्हणून त्यानं वचपा काढण्यासाठी सुपरमार्केटवर चालवली कार

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Viral video : Viral video of buffalo and lion goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.