अशी बनवली जाते छतावरील प्लास्टिकची टाकी; Video पाहून चकीत व्हाल..!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 17:34 IST2025-11-18T17:33:42+5:302025-11-18T17:34:38+5:30
Viral Video: व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!

अशी बनवली जाते छतावरील प्लास्टिकची टाकी; Video पाहून चकीत व्हाल..!
Viral Video: प्रत्येकाच्या घरावर काळ्या, निळ्या किंवा पांढऱ्या रंगाचा मोठमोठ्या पाण्याच्या टाक्या असतात. तुम्ही कधी विचार केला का, इतक्या मोठ्या टाक्या कशा बनवल्या जातात? सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यात या प्लास्टिकच्या पाण्याच्या टाक्या कशा तयार होतात, हे दाखवण्यात आले आहे.
पाण्याच्या टाक्या अशा तयार होतात!
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसते की, कामगार प्रथम निळ्या रंगाचे प्लास्टिक पावडर एका मोठ्या टाकीसारख्या साच्यात टाकतो. त्यानंतर हा साचा मशीनच्या मदतीने उचलून आगीवर फिरवला जातो. साच्याच्या आतल्या पावडरला तापमान मिळताच ते वितळून साच्याचा आकार घेते आणि हळूहळू टाकी तयार होते.
पाहा व्हिडिओ
साचा उघडल्यानंतर टाकी तयार
काही वेळ तापविल्यानंतर जेव्हा साचा उघडला जातो, तेव्हा त्यातून एक पूर्ण आकाराची प्लास्टिकची टाकी बाहेर येते. सुरुवातीला ही टाकी गरम आणि मऊ असते. पुढे तिला थंड करुन, तिची मजबुती वाढवली जाते. ही सोपी दिसणारी पण तंत्रशुद्ध प्रक्रिया पाहून अनेक यूजर्स आश्चर्यचकित झाले आहेत.
productsmaking या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर झालेल्या या व्हिडिओला लाखो व्ह्यूज आणि हजारो लाइक्सही मिळाले आहेत. व्हिडिओवरील कमेंट्समध्ये युजर्स म्हणथात, इतकी सोपी प्रक्रिया असेल, असे कधी वाटले नव्हते. आणखी एका युजरने म्हटले, मोठ्या गोष्टी अवघड वाटतात, पण प्रत्यक्षात सोप्या असतात.