Viral Video : दुकानदाराच्या डोळ्यांदेखत चोराने मोबाईल उचलून नेला अन् कुणाला कळलंही नाही! व्हिडीओ बघाच 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 14:05 IST2025-07-18T14:05:02+5:302025-07-18T14:05:30+5:30

Thief Viral Video : या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक चोर इतक्या सफाईने दुकानदारांच्या डोळ्यादेखत त्यांचा मोबाईल चोरून नेतो, की समोर बसलेल्या व्यक्तीलाही कळत नाही.

Viral Video: Thief took away mobile phone in front of shopkeeper and no one even noticed! Watch the video | Viral Video : दुकानदाराच्या डोळ्यांदेखत चोराने मोबाईल उचलून नेला अन् कुणाला कळलंही नाही! व्हिडीओ बघाच 

Viral Video : दुकानदाराच्या डोळ्यांदेखत चोराने मोबाईल उचलून नेला अन् कुणाला कळलंही नाही! व्हिडीओ बघाच 

आजकाल चोर किती बिनधास्त झाले आहेत, याचा प्रत्यय देणारा एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक चोर इतक्या सफाईने दुकानदारांच्या डोळ्यादेखत त्यांचा मोबाईल चोरून नेतो, की समोर बसलेल्या व्यक्तीलाही कळत नाही. ही चोरी करण्याची टेक्निक पाहून नेटकरीही चक्रावून गेले आहेत.

भर दिवसा दुकानात मोबाईल चोरी!

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली ही २१ सेकंदांची व्हिडीओ क्लिप चोरांची वाढती हिंमत दाखवून देते. आता चोर दिवसाढवळ्या देखील हात साफ करत आहेत. या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतंय की, दोन दुकानदार आपापल्या कामात मग्न आहेत. ते काहीतरी सामान मोजण्यात किंवा जुळवण्यात व्यस्त आहेत. याचवेळी एक व्यक्ती तिथून जातो आणि त्याची नजर चार्जिंगवर लावलेल्या मोबाईलवर पडते.

मोक्याची वाट पाहिली अन् सफाईने हात साफ केला!
चोराने पाहिलं की दोन्ही दुकानदार आपापल्या कामात गर्क आहेत, तर त्याने मोठ्या चलाखीने मोबाईल उचलला आणि तिथून सटकला. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, तो चोर आधी मोक्याची संधी साधण्यासाठी थोडा वेळ इकडे-तिकडे फिरतो, पुन्हा मागे येतो आणि अतिशय सफाईने चार्जिंगला लावलेला फोन चार्जरमधून काढतो. त्यानंतर, काही वेळातच तो पुन्हा परत येतो, तो मोबाईल खिशात टाकतो आणि वेगाने तिथून निघून जातो.

दुकानदारांना पत्ताही लागला नाही!
या चोराने ही चोरी इतक्या कौशल्याने केली की, दुकानदारांना त्याचा सुगावाही लागला नाही. हा व्हिडीओ एक्सवर'gharkekalesh या हँडलवरून शेअर करण्यात आला आहे, ज्याला आतापर्यंत ९० हजारांहून अधिक वेळा पाहिलं गेलं आहे. चोराची ही टेक्निक पाहून नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

नेटकरी म्हणतायत... 

एका युझरने कमेंट केली आहे की, "याची टेक्निक तर बघा, हा तर डिप्लोमाधारक चोर वाटतोय!" दुसऱ्याने म्हटलं की, "हा तर खूपच हुशार चोर आहे, कुणाला पत्ताही लागला नाही." एका युझरने विनोदाने लिहिलं की, "कामात इतकंही गर्क नसावं की फोन चोरीला जाईल आणि कळणारही नाही!"

Web Title: Viral Video: Thief took away mobile phone in front of shopkeeper and no one even noticed! Watch the video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.