आईनं दिलेलं बर्थ डे गिफ्ट उघडताच त्यानं ते छातीशी कवटाळलं; व्हिडिओ पाहुन तुम्ही व्हाल भावूक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2021 03:05 PM2021-09-10T15:05:21+5:302021-09-10T15:42:02+5:30

आई मुलाचं नात अत्यंत हृदयस्पर्शी असतं. या नात्यातील माया दर्शवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर (social media) मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ विशेष आहे कारण यातील मुलंही विशेष आहे. त्याच्या वाढदिवशी आईनं त्याला एक गिफ्ट दिलं अन् ते पाहताच त्यानं ते आपल्या पोटाशी कवटाळलं....

viral video special child priceless reaction on receiving phone as his birthday gift will make you smile | आईनं दिलेलं बर्थ डे गिफ्ट उघडताच त्यानं ते छातीशी कवटाळलं; व्हिडिओ पाहुन तुम्ही व्हाल भावूक

आईनं दिलेलं बर्थ डे गिफ्ट उघडताच त्यानं ते छातीशी कवटाळलं; व्हिडिओ पाहुन तुम्ही व्हाल भावूक

Next

आई मुलाचं नात अत्यंत हृदयस्पर्शी असतं. या नात्यातील माया दर्शवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर (social media) मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ विशेष आहे कारण यातील मुलंही विशेष आहे. त्याच्या वाढदिवशी आईनं त्याला एक गिफ्ट दिलं अन् ते पाहताच त्यानं ते आपल्या छातीशी कवटाळलं....

ट्वीटरवर पोस्ट करण्यात आलेला हा व्हिडिओ पाहुन तुमच्या डोळ्यात अक्षरश: पाणी येईल. बर्थडे साठी अख्खं घर सजलंय. या विशेष मुलानं छोटीशी टोपी घातलीय. समोर केक आहे. इतक्यात आई येते आणि त्याच्या हातात गिफ्ट देते. गिफ्टचा बॉक्स उघडण्याआधी तो तिला विचारतो आत काय आहे? नंतर तो गिफ्ट उघडतो. गिफ्ट उघडताना त्याचे हावभाव पाहुन तुमच्या डोळ्यात पाणी येईल. तो गिफ्ट उघडतो अन् गिफ्टला मिठीच मारतो. आत एक मोबाईल फोन असतो.

हा व्हिडिओ पाहुन नेटकरी खुप भावूक झाले आहेत.  एकानं तर कमेंट केलीय माझी पत्नी या विशेष मुलांच्या शाळेत शिक्षिका आहे. ती त्या शाळेत प्रत्येक क्षण प्रेमाने जगते.

 

Web Title: viral video special child priceless reaction on receiving phone as his birthday gift will make you smile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.