VIDEO : १५ फुटाहून लांब अजगराला खांद्यावर ठेवून घेऊन गेला, व्हिडीओ पाहून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2021 05:20 PM2021-11-04T17:20:16+5:302021-11-04T17:21:08+5:30

Social Viral :  व्हायरल व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एक व्यक्ती जड अजगराला आपल्या खांद्यावरून नेत आहे. अजगराची लांबी साधारण १५ फूट असल्याचं वाटत आहे.

Viral Video show a man carrying 15 feet long python on his shoulder | VIDEO : १५ फुटाहून लांब अजगराला खांद्यावर ठेवून घेऊन गेला, व्हिडीओ पाहून व्हाल हैराण

VIDEO : १५ फुटाहून लांब अजगराला खांद्यावर ठेवून घेऊन गेला, व्हिडीओ पाहून व्हाल हैराण

Next

Social Viral : सोशल मीडिया एका व्हिडीओने सध्या चांगलीच धुमाकूळ घातली आहे. व्हिडीओत एक व्यक्ती १५ फूटापेक्षाही जास्त लांब अजगरला  ज्याप्रकारे खांद्यावरून घेऊन जात आहे, ते पाहून लोक हैराण झाले आहेत. हा व्हिडीओ हृदयाची धडधड वाढवणारा व्हिडीओ आहे. खासकरून त्यांच्यासाठी ज्यांना सापाच्या नावानेच भीती वाटते. चला जाणून घेऊ या व्हिडीओत काय खास आहे.

व्हायरल व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एक व्यक्ती जड अजगराला आपल्या खांद्यावरून नेत आहे. अजगराची लांबी साधारण १५ फूट असल्याचं वाटत आहे. व्यक्ती अजगर खांद्यावर घेऊन पायऱ्या चढताना दिसत आहे. त्यानंतर तो एका घरात शिरतो. हा नजारा एखाद्या हॉरर सिनेमापेक्षा कमी नाही.

royal_pythons_ नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ लोकांना फारच आवडलाय. दोन दिवसांआधी शेअर झालेल्या या व्हिडीओला साधारण ६ हजार लोकांनी लाइक केलं आहे. हे लाइक्स वाढतच आहेत. व्हिडीओ पाहिल्यावर लोक कमेंट्सही करत आहेत. एका यूजरने कमेंट केली आहे की, 'आई हे बघ मी सोबत काय आणलंय, मी हे आपल्या घरात ठेवू शकतो का?'.  

हा व्हिडीओ पाहिल्यावर अनेक लोकांनी चिंता व्यक्त करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिलं की, 'भावा त्याला खाली ठेव. अरे बघ तरी तो मोठा आणि खतरनाक दिसत आहे'.
 

Web Title: Viral Video show a man carrying 15 feet long python on his shoulder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.