Video: कर्नाटकच्या जंगलातील दुर्मीळ दृश्य; बिबट्या अन् ब्लॅक पँथर एकत्र पाणी पिताना कॅमेऱ्यात कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 17:05 IST2026-02-13T17:03:33+5:302026-02-13T17:05:37+5:30

Viral Video: व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल...एकदा पाहाच

Viral Video: Rare sight in Karnataka forest; Leopard and black panther caught on camera drinking water together | Video: कर्नाटकच्या जंगलातील दुर्मीळ दृश्य; बिबट्या अन् ब्लॅक पँथर एकत्र पाणी पिताना कॅमेऱ्यात कैद

Video: कर्नाटकच्या जंगलातील दुर्मीळ दृश्य; बिबट्या अन् ब्लॅक पँथर एकत्र पाणी पिताना कॅमेऱ्यात कैद

Viral Video: वन्यजीवनातील दृश्ये नेहमीच लोकांचे लक्ष वेधून घेतात. असाच एक दुर्मीळ आणि थरारक क्षण सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये चक्क बिबट्या आणि ब्लॅक पँथर एकत्र पाणी पिताना दिसत आहेत. हा अद्भुत नजारा कर्नाटकच्याजंगलात पाहायला मिळाला.

भद्रा बॅकवॉटर्सजवळ कॅमेऱ्यात कैद झाला क्षण

कर्नाटकातील भद्रा बॅकवॉटर्स परिसरात एका वन्यजीव छायाचित्रकाराने हा दुर्मीळ क्षण आपल्या कॅमेऱ्यात टिपला. व्हिडिओमध्ये बिबट्या आणि ब्लॅक पँथर, हे दोन्ही मोठे शिकारी प्राणी एका शांत जलाशयाच्या काठावर एकमेकांच्या अगदी जवळ बसून पाणी पीत असल्याचे दिसतात. वन्यजीवनात असे क्षण क्वचितच पाहायला मिळतात.

सोहन सिंह यांनी शेअर केला व्हिडिओ

हा व्हिडिओ प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार सोहन सिंह यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. त्यांनी या क्षणाला “निसर्गाचा जादुई योगायोग” असे संबोधले. पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, “जेव्हा तारे एका रेषेत येतात, तेव्हा जादू घडते.” तसेच, हा क्षण दीर्घकाळ लक्षात राहील, असेही त्यांनी नमूद केले.

व्हिडिओत नेमके काय ?


व्हिडिओच्या सुरुवातीला बिबट्या पाण्याच्या अगदी काठाशी सावधपणे पाणी पिताना दिसतो. काही क्षणांतच तिथे ब्लॅक पँथर येतो. विशेष म्हणजे, त्याच्या वर्तनात ना आक्रमकता आहे, ना घाई. तो बिबट्याजवळ बसतो आणि दोघेही शांतपणे एकत्र पाणी पितात. हा क्षण शांत, संतुलित आणि विलक्षण वाटतो.

सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद

हा व्हिडिओ आतापर्यंत 10.5 मिलियनहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. सोशल मीडियावर तो वेगाने शेअर केला जात असून, वन्यजीव प्रेमी आणि छायाचित्रकारांनी या दृश्याच्या सौंदर्याबरोबरच ते टिपण्यासाठी लागणाऱ्या संयम आणि मेहनतीचेही कौतुक केले आहे.

नॅट जिओनेही केले कौतुक

Nat Geo Your Shot या अधिकृत अकाउंटने या दृश्याला “श्वास रोखून टाकणारा क्षण” असे म्हटले आहे. इतर अनेक प्रेक्षकांनी हा प्रसंग शक्तिशाली, भावनिक आणि अद्भुत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. काहींनी जंगलातील जीवन गूढ आणि अनिश्चित असल्याचे सांगत, असे क्षण अचानक आणि अनपेक्षितपणे समोर येतात, असे मत व्यक्त केले आहे. बिबट्या आणि ब्लॅक पँथर यांचा हा शांत सहवास निसर्गातील अलिखित आणि दुर्मीळ क्षणांची आठवण करून देणारा आहे. 

Web Title : दुर्लभ दृश्य: कर्नाटक में तेंदुआ और काला तेंदुआ एक साथ पानी पीते हुए।

Web Summary : कर्नाटक से एक दुर्लभ वीडियो सामने आया है जिसमें एक तेंदुआ और काला तेंदुआ शांतिपूर्वक एक साथ पानी पी रहे हैं। वन्यजीव फोटोग्राफर सोहन सिंह द्वारा कैद किए गए इस वीडियो को इसकी सुंदरता और इसे कैद करने के लिए आवश्यक धैर्य के लिए सराहा गया है।

Web Title : Rare sight: Leopard and black panther drink together in Karnataka.

Web Summary : A rare video from Karnataka shows a leopard and black panther peacefully drinking water together. Captured by wildlife photographer Sohan Singh, the video has gone viral, praised for its beauty and the patience required to capture it.