Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 20:21 IST2025-06-16T20:21:02+5:302025-06-16T20:21:23+5:30
सोशल मीडियावर सध्या एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून नेटकऱ्यांच्या अंगावर काटा उभा राहिला आहे.

Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
सोशल मीडियावर सध्या एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून नेटकऱ्यांच्या अंगावर काटा उभा राहिला आहे. या व्हिडीओमध्ये धबधब्याच्या अगदी जवळ दोन मुली एकामागून एक घसरताना दिसत आहेत. सुदैवाने, दोघीही थोडक्यात बचावल्या. या व्हिडीओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
धावपळीच्या जीवनातून कंटाळून लोक अनेकदा मनाच्या शांततेसाठी फिरायला जातात. काहीजण समुद्राकिनारी मौजमजा करतात, तर काहीजण डोंगरांवर फिरायला जातात. फिरणे आवश्यक आहे, पण या दरम्यान केलेला निष्काळजीपणा जीवघेणा ठरू शकतो, आणि व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ याचेच जिवंत उदाहरण आहे. हा व्हिडीओ कधी आणि कुठे रेकॉर्ड केला गेला आहे, याची कोणतीही माहिती उपलब्ध नाही.
काय झालं बघा...
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसते की, एक मुलगी धबधब्याच्या अगदी तोंडाजवळ जाते आणि अचानक घसरते. मुलीचे नशीब चांगले होते की, ती थेट खाली पडण्यापासून थोडक्यात वाचली. पण, आश्चर्य तेव्हा वाटते, जेव्हा काही वेळाने दुसरी मुलगीही त्याचप्रकारे घसरते. सुदैवाने, ती देखील धबधब्यात पडत नाही आणि अशा प्रकारे दोघींचेही प्राण वाचतात. हा व्हिडीओ पाहून लोकांच्या मनात हा प्रश्न निर्माण होत आहे की, एका मुलीसोबत असे घडल्यावर दुसऱ्या मुलीला त्याच मार्गावरून जाण्याची काय गरज होती?
पाहा व्हिडीओ
पापा की परी एग्जाम समझ के कॉपी कर ली 😂 pic.twitter.com/n5XP48pW0y
— Reetesh Pal (@PalsSkit) June 15, 2025
हा हृदय हेलावून टाकणारा व्हिडीओ 'एक्स'वर 'PalsSkit' नावाच्या हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये युझरने लिहिले की, "पापा की परी एग्जाम समझ के कॉपी कर ली." बातमी लिहेपर्यंत या पोस्टला ४७ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले होते, तर नेटकरी आश्चर्यचकित होऊन कमेंट करत आहेत.
रीलच्या नादात जीवाशी खेळ
एका युझरने कमेंट केली, "बाकी सगळे ठीक आहे, पण कोणतीही दुर्घटना होऊ नये." दुसऱ्या युझरने म्हटले, "रीलच्या नादात जीवाशी खेळ." आणखी एका युझरने लिहिले, "ही दुसरी का गेली तिथे?" तर एका युझरने म्हटले, "हे कोणत्याही अँगलने मजेदार नाही. दोघी वाचल्या, नाहीतर त्या थेट खाली पडल्या असत्या."