VIDEO : अरे वाह रे वाह! नवरी-नवरदेवाच्या मधे आला तिसरा व्यक्ती, व्हिडीओ पाहून व्हाल हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2021 13:50 IST2021-07-17T13:46:44+5:302021-07-17T13:50:04+5:30
दोन्ही परिवाराकडून दोन वेगवेगळे फोटोग्राफर बोलवले जातात आणि जे प्रत्येक क्षणाला कॅमेरात कैद करण्यासाठी धडपड करताना दिसतात.

VIDEO : अरे वाह रे वाह! नवरी-नवरदेवाच्या मधे आला तिसरा व्यक्ती, व्हिडीओ पाहून व्हाल हैराण
सोशल मीडियावर (Social Media) नवरी-नवरदेवांचे व्हिडीओ (Bride Groom Video) अलिकडे फारच व्हायरल होताना दिसतात. लग्नाचे रितीरिवाज पार पाडताना होणाऱ्या गमती-जमती पाहून सर्वांच्या चेहऱ्यावर हसू येतं. लग्नाच्या प्रत्येक क्षणांचे फोटो क्लिक करण्याचा अलिकडे ट्रेन्ड आला आहे. दोन्ही परिवाराकडून दोन वेगवेगळे फोटोग्राफर बोलवले जातात आणि जे प्रत्येक क्षणाला कॅमेरात कैद करण्यासाठी धडपड करताना दिसतात.
इन्स्टाग्राम रील्सवर एक लग्नाचा व्हिडीओ चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हिडीओत लग्नाचे रितीरिवाज करताना नवरी-नवरदेव दिसत आहेत. त्यांच्या आजूबाजूला त्यांचे नातेवाईक उभे आहेत. पण त्याहून अजब आहे स्टेजवर दोघांच्या मधे दिसणारा तिसरा व्यक्ती. ह्या तिसऱ्या व्यक्तीला पाहून सगळेच हैराण होतात. (हे पण वाचा : VIDEO : नवरीने मंडपात दाखवले असे नखरे, पळून गेला नवरदेव!)
या रील्स व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, नवरी-नवरदेवाच्या मधे जमिनीवर एक व्यक्ती लेटलेला आहे. बारकाईने पाहिले तर लक्षात येतं की, खाली लेटलेला व्यक्ती लग्नाची व्हिडीओग्राफी करणारा व्यक्ती आहे. त्याची ही मेहनत आणि जिद्द पाहून लोक त्याचं कौतुक करत आहेत. एका चांगल्या फोटोसाठी तो जमिनीवर झोपला आहे.
सोशल मीडिया साइट इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ निरंजन महापात्री नावाच्या यूजरने शेअर केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून आतापर्यंत या व्हिडीओला ४ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.