Viral Video : प्रवेशद्वारावरील मेटल डिटेक्टरला घंटा समजू लागले लोक; एकाने हात लावल्यावर पुढे काय झाले बघाच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 18:46 IST2025-11-19T18:45:31+5:302025-11-19T18:46:39+5:30
या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, लोक प्रवेश घेताना मेटल डिटेक्टरच्या दरवाज्याला श्रद्धेने हात लावत आहेत, जणू काही ते मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आहे.

Viral Video : प्रवेशद्वारावरील मेटल डिटेक्टरला घंटा समजू लागले लोक; एकाने हात लावल्यावर पुढे काय झाले बघाच!
सोशल मिडियावर कधी काय व्हायरल होईल याचा अंदाज लावणे खरंच कठीण आहे. सध्या एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो बघितल्यावर सगळ्यांनाच हसू येत आहे. या व्हिडीओमध्ये एका मंदिराचे प्रवेशद्वार दिसत आहे. या प्रवेशद्वारावर इतर ठिकाणांप्रमाणेच एक मेटल डिटेक्टर लावलेला दिसत आहे. या मेटल डिटेक्टरमधून प्रवेश करताना एका व्यक्तीने त्याच्या कमानीला स्पर्श केला. एकाने असे करताच पुढचे सगळेच लोक त्याला डिजिटल घंटा समजून हात लावून पुढे जाऊ लागले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, लोक प्रवेश घेताना मेटल डिटेक्टरच्या दरवाज्याला श्रद्धेने हात लावत आहेत, जणू काही ते मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल की, 'लोक किती भोळे आहेत!'
मेटल डिटेक्टर गेटमधून आशीर्वाद घेऊ लागले लोक!
सोशल मीडियावर हा व्हिडीओ खूप वेगाने व्हायरल होत आहे, यामध्ये काही लोक एका सार्वजनिक ठिकाणी प्रवेश करताना दिसत आहेत. हे लोक ग्रामीण भागातील असल्याचे दिसत आहेत. प्रवेशादरम्यान, जेव्हा ते मेटल डिटेक्टर डोरजवळ पोहोचतात, तेव्हा त्याला अशा प्रकारे हात लावून स्पर्श करतात, जणू काही तो कोणत्याही मंदिराचा किंवा धार्मिक स्थळाचा दरवाजा आहे आणि त्याला स्पर्श करणे पुण्याचे काम आहे.
मानसिक संतुलन इनका kya हो गया है yaar
— सत्यदर्शन ®️ (@pitamaha_b52862) November 18, 2025
😂😂😂😂😂
मतलब सब me भगवान का अक्ष देखने लगे हैं। pic.twitter.com/QEt6WlMCnL
लोकांचे अशाप्रकारे मेटल डिटेक्टरला स्पर्श करून आत जाणे, इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरला आहे. आता हा व्हिडीओ व्हायरल झाला, असून यूजर्स त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही यूजर्सने म्हटले आहे की, या डिजिटल युगातही लोकांना कुठे धार्मिकता दाखवायची आणि कुठे नियम पाळायचे याची समज नाही. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची अधिकृत पुष्टी सध्या झालेली नाही.
यूजर्सच्या प्रतिक्रिया
हा व्हिडीओ 'pitamaha_b52862' नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे आणि अनेकांनी लाईकही केला आहे. सोशल मीडिया यूजर्स या व्हिडीओवर विविध प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, "अशा लोकांवर कोणताही उपाय नाही, जसे चालले आहे तसे चालू द्या." दुसऱ्या एका यूजरने म्हटले की, "एकाने केले की सर्वजण त्याचप्रमाणे करू लागतात." तर, एका यूजरने प्रतिक्रिया दिली की, "मंदिराचा प्रत्येक दरवाजा पुण्य कमावून देतो."