Social Media Viral Baby Video: चिमुरडीची धमाल... Alexa ला सांगितलं, 'हे गाणं लाव' अन् पुढे जे झालं ते पाहून तुम्हालाही येईल हसू...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 18:05 IST2022-02-10T18:03:57+5:302022-02-10T18:05:08+5:30
हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहण्याचा तुम्हालाही आवरणार नाही मोह

Social Media Viral Baby Video: चिमुरडीची धमाल... Alexa ला सांगितलं, 'हे गाणं लाव' अन् पुढे जे झालं ते पाहून तुम्हालाही येईल हसू...
Social Media Viral Baby Video: लहान मुलांचे अनेक गोंडस व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतात, जे तुम्हाला पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात. काही वेळा तर लहान मुलांची हुशारी पाहून असा प्रश्नही पडतो की, इतक्या लहान वयात हे असं कसं करत असतील? सध्यादेखील इंटरनेटवर एका लहान मुलीचा अतिशय क्यूट व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओ सोशल मीडियावर लोकांची मनं जिंकत आहे. व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी Alexa ला एक गाणं लावायला सांगतोय आणि त्यानंतर काय मजा घडते.. त्याचा हा व्हिडीओ आहे.
सोशल मीडियावर हल्ली अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात ज्यात चिमुरड्यांचा निरागसपणा दिसून येतो. लहान मुलांचा स्वभाव हा लोकांची मनं जिंकणाराच असतो. व्हायरल झालेल्या व्हिडीओतही ती चिमुरडी साऱ्यांचे मन जिंकून घेत आहे. व्हिडीओत ती लहान मुलगी अॅलेक्सासमोर उभी राहून एका गाण्याची फर्माईश करताना दिसते. यानंतर लहान मुलगी म्हणते- अलेक्सा, 'ए..ए..ए..वेकेशन' हे गाणे सुरू कर. सुरुवातीला त्या लहान मुलीचा आवाज अलेक्साला समजत नाही. त्यामुळे ती पुन्हा एकदा तेच गाणं म्हणते. दुसऱ्या वेळी मात्र अलेक्सा लगेच ते गाणं लावते. गाणं सुरू होताच मुलीच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद स्पष्ट दिसतो. पाहा व्हिडीओ-
त्या चिमुरडीच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि संपूर्ण व्हिडीओ साऱ्यांनाच पुन्हा पुन्हा पाहण्याचा मोह आवरत नाही. हा व्हिडिओ खूप वेगाने व्हायरल होत आहे. यात मुलीच्या गोंडसपणाचे आणि तिच्या चेहऱ्यावरील हावभावांचे लोक मनापासून कौतुक करत आहेत. हे गाणं ज्या बँडचं आहे, त्या 'डर्टीहेड'ने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.