Holi Jugaad Viral Video: भन्नाट जुगाड! होळी खेळताना स्वत:कडचे रंग संपल्यावर मुलाने केला 'स्मार्ट' उपाय; भले भलेही होतील हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2022 17:56 IST2022-03-18T17:55:58+5:302022-03-18T17:56:59+5:30
तुम्ही पाहिलात का व्हिडीओ?

Holi Jugaad Viral Video: भन्नाट जुगाड! होळी खेळताना स्वत:कडचे रंग संपल्यावर मुलाने केला 'स्मार्ट' उपाय; भले भलेही होतील हैराण
आज देशभरात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. हा वर्षातील असा एक सण आहे, ज्याची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत असतो. या दिवशी लोक एकमेकांना रंग लावतात आणि रंगीत पाण्याने एकमेकांना भिजवून टाकतात. पण काही लोक असेही असतात जे या दिवशी खूप धमाल मस्ती करताना दिसतात. विशेषत: मुलांना धुळवडीच्या दिवशी काही ना काही मस्ती करावीशी वाटत असते. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओ पाहून तुम्हालाही नक्कीच तुमचे बालपणीचे दिवस आठवतील.
होळीच्या दिवशी लहान मुलं खूप धमाल करतात. पण जेव्हा मुलांकडचे रंग संपतात तेव्हा ते एकमेकांचे रंग हिसकावून घेतात. काही वेळा तर मुले रंग सोडून चिखलानेही होळी खेळतात. या संबंधीचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक मुलगा इतरांवर चक्क नाल्यातलं पाणी उडवताना दिसत आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, काही मुले एका मुलावर रंग फेकत होते. त्यावेळी तो मुलगा संतापला. याचा बदला घेण्यासाठी तो नाल्याजवळ गेला आणि नाल्यातील पाणी पिचकारीत भरून घेतलं. त्यानंतर पिचकारीतील पाणी इतर मुलांवर उडवू लागला. मुलाचं असं कृत्य पाहिल्यानंतर सारेच चक्रावून गेले.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक हैराण झाले असून त्यांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने व्हिडीओवर कमेंट करत लिहिले की, 'मुलाने खरोखरंच बदला घेण्यासाठी खतरनाक जुगाड केला.' तर दुसर्या यूजरने व्हिडिओवर कमेंट करत लिहिले, 'ही खरोखरच नेक्स्ट लेव्हल होळी आहे.' याशिवाय आणखी एका यूजरने लिहिलं, 'हा व्हिडिओ पाहून मला माझे बालपणीचे दिवस आठवले.' या व्हिडीओवर आणखीही अनेक युजर्सने मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.