Viral Video : अरे बापरे हे काय बघितलं! महिलेने कॅमेरा सुरू केला अन् पुढे जे काही घडलं... ; व्हिडीओ बघून तुम्हीही हैराण व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 12:38 IST2025-09-24T12:38:04+5:302025-09-24T12:38:37+5:30

सोशल मीडिया म्हटलं की, काहीही व्हायरल होऊ शकतं. सध्या सोशल मीडियावर दररोज लाखो व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण, आता ...

Viral Video: Oh my god, what did you see! The woman turned on the camera and what happened next...; You will be shocked after watching the video! | Viral Video : अरे बापरे हे काय बघितलं! महिलेने कॅमेरा सुरू केला अन् पुढे जे काही घडलं... ; व्हिडीओ बघून तुम्हीही हैराण व्हाल!

Viral Video : अरे बापरे हे काय बघितलं! महिलेने कॅमेरा सुरू केला अन् पुढे जे काही घडलं... ; व्हिडीओ बघून तुम्हीही हैराण व्हाल!

सोशल मीडिया म्हटलं की, काहीही व्हायरल होऊ शकतं. सध्या सोशल मीडियावर दररोज लाखो व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण, आता एक असा व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हीही म्हणाल की, या ताई तर स्पायडर मॅनलाच टक्कर देत आहेत. हा व्हिडीओ इतका व्हायरल झाला आहे की, तब्बल ३ कोटी लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

एका तरुणीने काहीही विशेष न करता कोट्यवधी व्ह्यूज मिळवले आहेत. या तरुणीचा व्हिडीओ पाहून तुम्हालाही नक्की हसू आवरणार नाही. घरच्या अंगणात कॅमेरा सुरू करून या महिलेने केलेल्या कृतीमुळे सोशल मीडियावर तिचा व्हिडीओ प्रचंड चर्चेत आहे

व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे?

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका कौलारू घराच्या अंगणात एक बकरी दिसत आहे. पण खरी मजा तेव्हा येते, जेव्हा पिवळ्या रंगाचा ड्रेस घातलेली एक तरुणी धावत येते. ती धावत जाऊन भिंतीवर चढते आणि नंतर कौलांवर जाऊन बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानची सिग्नेचर पोज देते. ती ही पोज स्लो-मोशनमध्ये करते, जे पाहताना तुम्हालाही नक्कीच हसू येईल.

हा व्हिडओ 'इन्स्टाग्राम'वरील 'comedy_girl_143_' अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत तीन कोटींपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तसेच, ३. ५४ हजारांपेक्षा जास्त लोकांनी तो लाईकही केला आहे.


स्पायडर मॅन दीदी!

या रीलवर लोकांनी मजेदार कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने तिला 'स्पायडर मॅन दीदी' असे म्हटले आहे. तर दुसऱ्या युजरने लिहिले की, 'जसे बीसीसीआयने श्रेयस अय्यरकडे दुर्लक्ष केले, तसे मी या दीदीकडे दुर्लक्ष केले'. तर एका युजरने मजेशीर कमेंट करताना म्हटले की, 'खाली असलेली बकरी म्हणतेय, बाई, खाली उतर'.

Web Title: Viral Video: Oh my god, what did you see! The woman turned on the camera and what happened next...; You will be shocked after watching the video!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.