जीवापाड जपलेल्या श्वानांना डोळ्यासमोर पाहताच मालक झाला भावूक; मन हेलावून टाकणारा Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 04:32 PM2024-05-09T16:32:38+5:302024-05-09T16:35:22+5:30

सध्या सोशल मीडियावर ब्राझीलमधील एक हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल होत आहे.

viral video of southern brazilian state of rio grande deo sul rescue of dog who stuck into flood her owner become emotional to see them  | जीवापाड जपलेल्या श्वानांना डोळ्यासमोर पाहताच मालक झाला भावूक; मन हेलावून टाकणारा Video व्हायरल

जीवापाड जपलेल्या श्वानांना डोळ्यासमोर पाहताच मालक झाला भावूक; मन हेलावून टाकणारा Video व्हायरल

Social viral : मागील काही दिवसांमध्ये ब्राझीलच्या दक्षिण भागात मुसळधार पाऊस झाला. पूर तसेच भुस्खलनामुळे तिथे बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका ब्राझीलमधील  रिओ ग्रांदे डो सुल राज्यातील पोर्टो अलेग्रे या भागाला बसला. दरम्यान, या पूरामुळे ब्राझीलमधील ७० हजारांपेक्षा जास्त लोकांचं स्थलातंर करण्यात आलं . त्याचबरोबर पुराच्या वाढत्या पाण्यामुळे तेथील नागरिकांना घराच्या छतावर जाऊन राहावं लागलं. या पूरामध्ये अडकलेल्या नागरिकांची हेलिकॉप्टरच्या माध्यमातून सुटका करण्यात आली. त्याचा एक हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून कोणाच्याही डोळ्यामध्ये अश्रू तरळतील.

मुसळधार पावसामुळे ब्राझीमधील जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच या पूराचा फटका मुक्या प्राण्यांनाही बसला. येथे पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली. या पुरामध्ये तेथील एका श्वानप्रेमी व्यक्तीचा मन हेलावून टाकणारा व्हिडिओ समोर आला आहे. पुराच्या पाण्यात त्या व्यक्तीचे श्वान अकडून राहिले होते. त्यांना पाहण्यासाठी या व्यक्तीचा जीव झुरत होता. अखेर शर्थीच्या प्रयत्नानंतर रेस्क्यू टीमने त्या श्वानांची पुराच्या पाण्यातून सुखरुप  सुटका केली. आपल्या लाडक्या श्वानांना डोळ्यासमोर पाहताच त्या मालकाला अश्रू अनावर होतात. या व्हिडिओने नेटकऱ्यांच्या भावनांना साद घातली आहे. पोटच्या लेकारांप्रमाणे जीव लावलेल्या पाळीव श्वानांना तो व्यक्ती मीठी मारून ढसाढसा रडताना दिसतोय. 


goodnews_movement नावाच्या  इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. आपल्या मुलांप्रमाणे सांभाळ करत मायेने श्वानांना तो व्यक्ती जवळ करताना दिसत आहे. त्यांना मायेने कुरवाळत तो ढसाढसा रडू लागतो. आतापर्यंत हा व्हिडिओ ६० हजारांपेक्षा अधिक लोकांनी पाहिला असून काहीजण तर भावूक झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

Web Title: viral video of southern brazilian state of rio grande deo sul rescue of dog who stuck into flood her owner become emotional to see them 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.