मुंबईच्या रस्त्यावर रिक्षाचालकाच्या गाण्याची 'ट्रीट'; सुप्रसिद्ध संगीतकारालाही पडली भूरळ, Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 12:20 IST2023-12-11T12:19:11+5:302023-12-11T12:20:34+5:30

सध्या मुंबईतील एका रिक्षाचालकाच्या टॅलेंटची  सर्वत्र चर्चा होतेय,  व्हिडीओ होतोय व्हायरल...  

Viral video of Mumbai Auto Driver Sang Khoya Khoya chand mohmmed rafi song amit trivedi shared video on instagram  | मुंबईच्या रस्त्यावर रिक्षाचालकाच्या गाण्याची 'ट्रीट'; सुप्रसिद्ध संगीतकारालाही पडली भूरळ, Video व्हायरल

मुंबईच्या रस्त्यावर रिक्षाचालकाच्या गाण्याची 'ट्रीट'; सुप्रसिद्ध संगीतकारालाही पडली भूरळ, Video व्हायरल

Auto Driver Viral Video: सोशल मीडियावर दिवसेंदिवस नानाविध प्रकारचे व्हिडीओ शेअर केले जातात.  सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या कलागुणांना वाव देण्याचा प्रत्येकाचा कल असतो. अशाच एका रिक्षाचालकाने त्याच्या गायकीने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. मुंबईतील हा ऑटोड्रायव्हर सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. 

हल्ली मुंबईच्या रस्त्यावर एक रिक्षाचालक गाणं गाताना दिसत आहे. या सर्वसामान्य रिक्षाचालकाचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. रिक्षामध्ये तो गाणं गातोय. सर्वसामान्य प्रवाशाला मिळणारी ही सुरांची अस्सल मेजवानी आहे. आपल्या कलेला जोपासण्याचे काम हा रिक्षाचालक करतोय. हा व्हिडीओ मुंबईतील वांद्रे येथील असल्याचे सांगितले जात आहे.

मोहम्मद रफी यांनी गायलेलं 'खोया खोया चांद खुला आसमान' हे गाणं हा रिक्षाचालक गात आहे. त्याच्या सुरेल आवाजाने नेटकरी अवाक् झाले आहेत.  विशेष म्हणजे या रिक्षाचालकाच्या गायकीची दखल सुप्रसिद्ध संगीतकार अमित त्रिवेदीने घेतलीय.  इतकंच नाही तर खुद्द अमित त्रिवेदीनेच या रिक्षाचालकाचा व्हिडीओ त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. अमित त्रिवेदीने या रिक्षाचालकाच्या गायनाचे कौतुक देखील केले आहे.
 
व्हायरल व्हिडीओमध्ये हा रिक्षाचालक भरधाव वेगात मुंबईच्या रस्त्यांवर फिरतोय. रिक्षाला रंगीबेरंगी लाईटींग करत हातात माईक घेवून हा रिक्षाचालक मोहम्मद रफी यांच गाणं गाताना दिसतोय. 

या व्हिडीओवर अनेक यूजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'खुप सुंदर टॅलेंट आहे', 'रिक्षा ड्रायव्हर खूप टॅलेंटेड आहे' अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

येथे पाहा व्हिडीओ :

Web Title: Viral video of Mumbai Auto Driver Sang Khoya Khoya chand mohmmed rafi song amit trivedi shared video on instagram