माणसातील देव! पुराच्या पाण्यात अडकलेल्या श्वानाला रेस्क्यू टीमकडून जीवनदान; Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 15:38 IST2023-12-08T15:36:32+5:302023-12-08T15:38:45+5:30
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या श्वानाला रेस्क्यू टीम वाचवताना दिसतेय. या व्हायरल व्हिडीओने माणसातील माणुसकीचे दर्शन घडवले आहे.

माणसातील देव! पुराच्या पाण्यात अडकलेल्या श्वानाला रेस्क्यू टीमकडून जीवनदान; Video व्हायरल
Viral Video : सोशल मीडियावर दररोज वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होतात. हे व्हायरल व्हिडीओ आपल्याला कधी हसवणारे असतात तर कधी डोळ्यात पाणी आणणारे असतात. असाच एक ह्रदयस्पर्शी व्हिडीओ समोर आला आहे. शिवाय हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस देखील उतरला आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मिचॉंग चक्रीवादळामुळे चेन्नईत संपूर्ण पूरस्थिती निर्माण झाली. मुसळधार बरसणाऱ्या पावसाने तिथे अक्षरश: धुमाकूळ घातला. त्यामुळे चेन्नईतील जनजीवन विस्कळीत झालेच पण त्याचा फटका निष्पाप प्राण्यांना देखील बसल्याचे पाहायला मिळाले. या व्हायरल व्हिडीओमध्ये चेन्नईमध्ये आलेल्या पुराची विदारक स्थिती दिसते आहे. पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या एका श्वानाचा जीव वाचवतानचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओने नेटकऱ्यांच्या भावनांना स्पर्श केलाय.
व्हिडीओमध्ये पुराच्या पाण्यातून एक व्यक्ती श्वानाला बोटीमध्ये उचलुन ठेवत आहे. त्यामुळे हा व्हिडीओ नेटकऱ्यांना चांगलाच भावला आहे. माणुसकीचा धडा देणाऱ्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत. सोबत नेटकरी या व्हिडिओवर लाइक्सचा पाऊस पाडत आहेत. एक्सवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ १ लाखांपेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे.
येथे पाहा व्हिडीओ:
Humanity still alive ♥️
— ɪ ɴ ᴛ ʀ ᴏ ᴠ ᴇ ʀ ᴛ (@curse_introvert) December 6, 2023
Thank you Rescue team #ChennaiFloods2023#ChennaiRains#CycloneMichaung#ChennaiFlood#ChennaiRains#ChennaiRains2023#chennaicyclonepic.twitter.com/XM2LXUUtm8