VIDEO: शिल्लक राहिलेल्या बिर्याणीपासून बनवला केक, दिसतोय खुपच सुरेख; पाहा 'रेसिपी'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 16:30 IST2025-03-17T16:29:25+5:302025-03-17T16:30:48+5:30
Biryani Cake Viral Video: व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये शेफने चक्क 'बिर्याणी केक' बनवला आहे

VIDEO: शिल्लक राहिलेल्या बिर्याणीपासून बनवला केक, दिसतोय खुपच सुरेख; पाहा 'रेसिपी'
Biryani Cake Viral Video: फूड एक्सपेरिमेंट म्हणजे खाद्यपदार्थांवर विविध प्रयोगांच्या नावाखाली लोक काहीही बनवतात. बहुतांश वेळा अशा प्रकारचे पदार्थ पाहून डोक्यात तिडीक जाते. 'चांगल्या पदार्थाची वाट का लावली' असा प्रश्न आपोआपच तोंडून बाहेर पडतो. पण नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाला असून, त्यात एका शेफने चक्क बिर्याणीचा केक बनवला आहे. या केक दिसायला खूपच सुंदर असला तरीही त्याच्या चवीबाबत कोणीही कसलीच हमी देऊ शकत नाही.
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ एका प्रसिद्ध शेफचा आहे, ज्याने शिल्लक राहिलेल्या बिर्याणीपासून केक तयार केला आहे. केक हा सामान्यपणे गोड पदार्थ म्हणून खाल्ला जातो. तर बिर्याणी ही मसालेदार असल्यास मज्जा येते. त्यामुळे बिर्याणीचा केक कोण खाणार, अशी चर्चाच सोशल मीडियावर या व्हिडीओमुळे रंगल्याचे दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसते की, शेफ उरलेली बिर्याणी वेगवेगळ्या केकच्या थरांमध्ये सेट करतो. यानंतर तो पदार्थ केकच्या साच्यात टाकतो. अखेर त्यावर दही आणि पुदिन्याची चटणी टाकली जाते आणि त्यावर एक विशेष थर बनवला जातो, ज्यामुळे ते अगदी केकसारखे दिसते. पाहा Video-
हा व्हिडिओ thejoshelkin नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला आहे. तसेच, अनेकांनी याबाबत संमिश्र प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत.