आरारारा खतरनाक! केवळ ५ सेकंदाचा हा व्हिडीओ पाहून लोटपोट होऊन हसाल, विश्वास नसेल बसत तर लगेच बघा.....
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2021 16:17 IST2021-03-02T16:13:09+5:302021-03-02T16:17:39+5:30
Social Viral : आयपीएस अधिकारी रूपिन शर्मा यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ एका दुकानात तयार केला आहे.

आरारारा खतरनाक! केवळ ५ सेकंदाचा हा व्हिडीओ पाहून लोटपोट होऊन हसाल, विश्वास नसेल बसत तर लगेच बघा.....
सोशल मीडियावर नेहमीच अनेक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत असतात. आतापर्यंत तुम्ही धुरासोबत अनेक कर्तब केले जाणारे व्हिडीओ पाहिले असतील. म्हणजे धुराने राउंड करणे किंवा जलेबी पाडणे. सोशल मीडियावर ५ सेकंदाच एक असाच पण जरा वेगळा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून लोक पोट धरून हसत आहेत. याने त्यांचा स्ट्रेस दूर होत आहे. तुम्हालाही तुमचा स्ट्रेस घालवायचा असेल तर हा व्हिडीओ बघाच.
आयपीएस अधिकारी रूपिन शर्मा यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ एका दुकानात तयार केला आहे. यात दुकानदारासहीत ३ लोक दिसत आहेत. यात एक व्यक्ती तोंडातून धूर सोडत आहे. दुकानदार आणि दुकानातील तिसरी व्यक्ती धुराच्या या लोळाकडे एकटक बघत आहेत. अशात धूर सोडणारी व्यक्ती दुकानदाराच्या कानाखाली आवाज काढून तिथून पळ काढते. (हे पण बघा : शोधाशोध! 'या' फोटोत लपलेला पक्षी शोधून शोधून लोक थकलेत, बघा तुम्हाला तरी दिसतो?)
Knowingly by Mistake 🤣🤣 pic.twitter.com/s4dxSduGCp
— Rupin Sharma IPS (@rupin1992) February 25, 2021
कानाखाली एक चापट मारून ती व्यक्ती तिथून पळून जाते. पण दुकानदाराला लगेच काही लक्षात येत नाही. तो दुकानातून सामान उचलून त्याला फेकून मारतो. पण तोपर्यंत तो गेलेला असतो. रूपिन शर्मा यांनी या फनी व्हिडीओच्या कॅप्शनला लिहिले आहे की, मुद्दामहून केलेली चूक. केवळ ५ सेकंदाचा हा व्हिडीओ पाहून लोक लोटपोट होऊन हसत आहे. (हे पण वाचा : VIDEO : समुद्र किनारी उड्डाण घेत होतं विमान, संतुलन बिघडलं आणि मग....)
सोशल मीडिया यूजर्सना हा व्हिडीओ चांगलाच आवडला आहे. लोक यावर मजेदार कमेंट्स करत आहेत. आणि शेअरही करत आहेत. त्यांच्या प्रतिक्रिया पाहून हे लक्षात येत आहे की, ते हा व्हिडीओ पाहून मनभरून हसत आहेत.