Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 15:23 IST2025-06-28T15:22:16+5:302025-06-28T15:23:48+5:30

बऱ्याच वेळा माणसाच्या मनात राग इतका भरलेला असतो की, तो काय करेल याचा नेम नसतो.

Viral Video Man fought with his wife and set fire to the metro! The video is going viral | Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल

Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल

बऱ्याच वेळा माणसाच्या मनात राग इतका भरलेला असतो की, तो काय करेल याचा नेम नसतो. विशेषतः पती-पत्नीच्या भांडणात असे प्रसंग अनेकदा पाहायला मिळतात, ज्याच्या कहाण्या सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक धक्कादायक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. एका व्यक्तीने बायकोशी भांडणाच्या रागातून चक्क मेट्रो ट्रेनच्या डब्यालाच आग लावली आणि हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

काय आहे प्रकरण?

व्हायरल होत असलेले हे प्रकरण दक्षिण कोरियातील आहे. इथे एका ६७ वर्षीय व्यक्तीला त्याच्या पत्नीने भांडून घटस्फोट दिल्याने तो खूप निराश झाला होता. याच निराशेपोटी त्याने धावत्या मेट्रो ट्रेनच्या डब्यात आग लावली. योनहाप या वृत्तसंस्थेनुसार, ही धक्कादायक घटना ३१ मे रोजी घडली, ज्यात अनेक लोक जखमी झाले आणि सार्वजनिक मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले. या घटनेसाठी वोन नावाच्या व्यक्तीला जबाबदार धरण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या घटनेनंतर वोनवर हत्येचा प्रयत्न, धावत्या ट्रेनमध्ये आग लावणे आणि रेल्वे सुरक्षा कायद्याचे उल्लंघन यांसारखे अनेक गंभीर आरोप लावण्यात आले आहेत.

व्हिडीओमध्ये काय दिसले?

व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, वोनने मेट्रोच्या डब्यात पेट्रोल ओतले आणि नंतर आपल्या कपड्यांना आग लावून ते पेट्रोलवर फेकले. यामुळे संपूर्ण मेट्रोमध्ये धूर पसरला आणि मोठी आग लागली. या आग लागल्यामुळे २२ प्रवाशांना त्रास झाला आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. याव्यतिरिक्त, १२९ इतर प्रवाशांना घटनास्थळीच उपचार देण्यात आले, कारण त्यांची स्थिती जास्त गंभीर नव्हती. या घटनेत सुमारे ३३० दशलक्ष वॉन (सुमारे २.५ कोटी भारतीय रुपये) इतक्या मालमत्तेचे नुकसान झाले, ज्यात मेट्रोच्या एका डब्याचेही मोठे नुकसान झाले आहे.

सोशल मीडियावर खळबळ

हा व्हिडीओ 'XXV_mon' नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत ६९ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे आणि लोक कमेंट सेक्शनमध्ये आपल्या तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले, "भाऊ, भांडणे तर सामान्य आहेत, पण अशी कृती कोणी कशी करू शकतो?" तर दुसऱ्याने लिहिले, "बरं झालं त्याच्या पत्नीने त्याला सोडून दिले... अशा वेड्यासोबत कोण राहणार?" आणखी एका यूजरने म्हटले की, "अशी कृती करण्याबद्दल कोणी विचारही कसा करू शकतो?"

Web Title: Viral Video Man fought with his wife and set fire to the metro! The video is going viral