शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 16:47 IST

पाकिस्तानमधील कराचीमधून एक असा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे, जो पाहून तुम्ही हसून वेडे व्हाल.

पाकिस्तानमधील कराचीमधून एक असा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे, जो पाहून तुम्ही हसून वेडे व्हाल. आपल्या हटके रिपोर्टिंग स्टाइलने हा पाकिस्तानी रिपोर्टर इंटरनेटवर अक्षरशः धुमाकूळ घालत आहे आणि प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावत आहे.

या व्हायरल क्लिपमध्ये अब्दुल रहमान खान नावाचा एक मध्यवयीन रिपोर्टर 'लाइव्ह रिपोर्टिंग'ची संकल्पनाच एका नव्या स्तरावर घेऊन गेला आहे. हवामानाची माहिती देण्यासाठी तो थेट समुद्रकिनाऱ्यावर पोहोचतो आणि समुद्राच्या खोलीबद्दल इतक्या मजेदार आणि अतिशयोक्तीपूर्ण पद्धतीने बोलू लागतो की, ऐकणारे थक्क होतात. त्याच्या रिपोर्टिंगमधील उत्साह इतका जबरदस्त असतो की, काय योग्य आणि काय अयोग्य हे त्यालाही कळत नाही.

पाण्यात उतरून रिपोर्टिंगचा जलवा!व्हिडीओ बघताना धक्का तर तेव्हा बसतो, जेव्हा अब्दुल रहमान खान जराही न कचरता, आपला मायक्रोफोन हातात धरून थेट समुद्रात उडी घेतो आणि मग पाण्यातूनच पोहत पोहत आपली रिपोर्टिंग सुरू ठेवतो. तो समुद्र किती खोल आहे, हे सांगण्यासाठी मायक्रोफोन आयडीसह पाण्यात डुबकी मारतो आणि पुन्हा वर येऊन पाणी किती खोल आहे, याचे वर्णन करतो. त्याच्या या मजेदार करामती पाहून व्हिडीओ पाहणारे अवाक् झाले आहेत.

'चांद नवाब'ची आठवण करून देणारा रिपोर्टरआपल्या कॅमेरामन तैमूर खानसोबत हा रिपोर्टर घाईघाईने आपली रिपोर्टिंग संपवतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे आणि लोकांना अक्षरशः पोट धरून हसायला लावत आहे. २००८ मध्ये पाकिस्तानी टीव्ही रिपोर्टर चांद नवाबने अशाच प्रकारची एक घटना केली होती, ज्याचा व्हिडीओ आजही लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. अब्दुल रहमान खानच्या या व्हिडीओला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भरभरून प्रतिक्रिया मिळत आहेत. एका युझरने व्हिडीओ पाहिल्यानंतर मस्करी करत लिहिले, "पाकिस्तानच्या पत्रकारांमध्ये गजब प्रतिभा आहे." तर दुसऱ्याने "हा हा हा, खूप चांगली पत्रकारिता!" अशी प्रतिक्रिया दिली.

हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही नक्कीच हसू आवरता येणार नाही. हा रिपोर्टर केवळ हवामानाची माहिती देत नाहीये, तर तो स्वतःच एक 'मोसमी वादळ' बनला आहे.

टॅग्स :Viral Videoव्हायरल व्हिडिओJara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया