little girl meets police uncle viral video: सोशल मीडियावर लहान मुला-मुलींचे व्हायरल होणारे व्हिडीओ नेटकऱ्यांना खूप आवडतात. हे व्हिडीओ नेहमी खूप फॉरवर्डही केले जातात. सध्या असाच एका लहान मुलीचा ट्रेनमधील व्हिडीओ चर्चेत आहे. त्या लहान मुलीचा पोलिस अधिकाऱ्याशी होत असलेला लोभसवाणा संवाद खूपच आनंददायी आहे. या संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हिडिओ क्लिपमध्ये असा दावा केला जात आहे की या मुलीने फक्त टीव्हीवरील कार्टून शोमध्येच पोलिसांना पाहिले होते. जेव्हा तिने पहिल्यांदाच समोर एका खऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला गणवेशात पाहिले, तेव्हा तिला खूपच आनंद झाला. तिचा उत्साह खरोखरोच पाहण्यासारखा होता. त्या मुलीच्या प्रतिक्रियेने सर्वांचीच मन जिंकले. पाहा व्हिडीओ-
दरम्यान, हा व्हिडिओ लतीफा मोंडल नावाच्या एका युजरने इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. व्हायरल व्हिडिओच्या सुरुवातीला एक पोलिस अधिकारी वरच्या बर्थवर बसलेल्या मुलीला 'हॅपी जर्नी' म्हणतो. तेव्हा मुलगी उत्साहाने त्या पोलिस अधिकाऱ्याशी गप्पा मारू लागते. त्यानंतर, ती लहान मुलगी पोलिस कर्मचाऱ्याला हाय फाईव्ह' उत्साहित होते.