VIDEO: कडाक्याच्या थंडीत 'नागिन डान्स'... भारतीय जवानांच्या उत्साहापुढे बर्फही पडला फिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 16:07 IST2026-02-10T16:05:14+5:302026-02-10T16:07:41+5:30
indian army naagin dance in viral video: लष्कराच्या जवानांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

VIDEO: कडाक्याच्या थंडीत 'नागिन डान्स'... भारतीय जवानांच्या उत्साहापुढे बर्फही पडला फिका
indian army naagin dance in viral video: भारतातील अनेक ठिकाणी हाडे गोठवणारी थंडी असते आणि श्वासोच्छवासही कठीण असतो. अशा अत्यंत दुर्गम भागात भारतीय सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांचा एक व्हिडिओ भारतीयांची मने जिंकत आहे. सोशल मीडियावर भारतीय लष्कराच्या जवानांचा एक अतिशय उत्साहवर्धक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जवान १८,००० फूट उंचीवर आणि - ५० अंश सेल्सिअस तापमानात 'नागिन डान्स' करताना दिसत आहेत.
जवानांचा जबरदस्त जोश
व्हिडिओमध्ये बर्फाच्छदित प्रदेशातील जमिनीवर भारतीय लष्कराचे जवान लष्करी पेहरावात (Winter Gear) अतिशय आनंदात 'नागिन डान्स' करताना दिसत आहेत. लग्नाच्या वरातीत जसा उत्साह असतो, तसाच काहीसा उत्साह या जवानांच्या डान्समध्ये पाहायला मिळत आहे. हा डान्स केवळ मनोरंजनासाठी नाही, तर वैद्यकीय कारणासाठी (Medical Science) केला जातो. सियाचीन किंवा गलवान सारख्या अत्यंत थंड भागात शरीर स्थिर राहिल्यास रक्त गोठण्याची (Blood clotting) किंवा 'फ्रॉस्टबाइट' होण्याची भीती असते. अशा परिस्थितीत डान्स, उड्या मारणे किंवा हालचाल करणे हे शरीरासाठी 'नॅचरल हीटर'सारखे काम करते, ज्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत राहते.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
हा व्हिडिओ silentpatriot3 नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, तो सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून 'जय हिंद'च्या कमेंट्सचा पाऊस पडत आहे. एका युजरने लिहिले की, "आम्ही घरात पांघरूण बसून थंडीची तक्रार करतो, आणि इथे आमचे वाघासारखे शूर सैनिक आमचे रक्षण करत आहेत." दरम्यान, हा व्हिडिओ नेमका कधीचा आणि कुठला आहे याची अधिकृत पुष्टी झालेली नाही, मात्र जवानांचा हा बाणा पाहून प्रत्येक भारतीय अभिमान व्यक्त करत आहे.