Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 17:44 IST2025-06-25T17:43:39+5:302025-06-25T17:44:14+5:30

सोशल मीडियावर सध्या एका आजीबाईंचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.

Viral Video: Grandma drove a tractor in such a way that everyone was watching! Netizens are also saying wow... | Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

सोशल मीडियावर सध्या एका आजीबाईंचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. ८० वर्षांच्या या रॉकस्टार आजीबाईंनी पूर्ण आत्मविश्वासाने आणि 'देसी स्वॅग'मध्ये ट्रॅक्टर चालवून इंटरनेटवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. आजीबाईंचा हा जोशपूर्ण अंदाज पाहून नेटकरी त्यांचे चाहते झाले आहेत.

आत्मविश्वासाने ट्रॅक्टर चालवणाऱ्या आजीबाई!
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, या सुपरकूल आजीबाई फक्त ट्रॅक्टर स्टार्टच करत नाहीत, तर त्या पूर्ण 'स्वॅग'मध्ये ट्रॅक्टर चालवत व्हिडिओ देखील बनवून घेतात. त्यांच्या चेहऱ्यावर असलेला आत्मविश्वास आणि स्मितहास्याने त्यांनी नेटकऱ्यांची मने जिंकून घेतली आहेत. हा व्हिडिओ पाहून प्रत्येकजण म्हणतोय की, "आपल्यातही आजी इतकी हिंमत असती!"

पाहा व्हिडिओ :

ज्या पद्धतीने आजीबाई ट्रॅक्टरचे स्टिअरिंग सांभाळत आहेत आणि बिंधास्तपणे गियर बदलत आहेत, ते खरोखरच जबरदस्त आणि पाहण्यासारखे आहे. या आजीबाईंचा हा दमदार व्हिडिओ 'askshivanisahu' या एक्स हँडलवरून शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत ८० हजारांहून अधिक लोकांनी आहे. या व्हिडिओवर कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडला आहे.

एका युझरने लिहिले आहे, "बस आजीबाईंइतकंच धैर्य पाहिजे." दुसऱ्या युझरने म्हटले की, "आजीबाईंनी पुन्हा एकदा सिद्ध केले की, वय हा फक्त एक आकडा आहे." आणखी एका युझरने 'पुष्पा' स्टाइलमध्ये कमेंट केली, "दादी समझकर फ्लावर समझे क्या, फायर है मैं."

Web Title: Viral Video: Grandma drove a tractor in such a way that everyone was watching! Netizens are also saying wow...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.