Video - शिक्षणासाठी काय पण! गरिबीसमोर झुकल्या नाही; भाजीच्या गाडीखाली बसून केला अभ्यास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 14:49 IST2026-03-15T14:49:04+5:302026-03-15T14:49:51+5:30

शिक्षणाचं महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या मुली सर्वांचच लक्ष वेधून घेत आहेत. सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असलेला व्हिडीओ एका बाजारातील आहे.

viral Video girls doing their schoolwork under vegetable cart in sabji market | Video - शिक्षणासाठी काय पण! गरिबीसमोर झुकल्या नाही; भाजीच्या गाडीखाली बसून केला अभ्यास

Video - शिक्षणासाठी काय पण! गरिबीसमोर झुकल्या नाही; भाजीच्या गाडीखाली बसून केला अभ्यास

एका चांगल्या समाजासाठी शिक्षण किती महत्त्वाचं आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. विशेषतः महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण अधिकच गरजेचं ठरतं. सरकारदेखील 'बेटी बचाओ-बेटी पढाओ' सारख्या घोषणांद्वारे लोकांना जागरूक करत असतं, जेणेकरून मुलींच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये.

अनेक मुलींचं शिक्षण जुनाट विचारसरणीमुळे थांबतं, तर कधी गरिबी शिक्षणावर भारी पडते. मात्र, या मुलींनी हे सिद्ध करून दाखवलं की, परिस्थिती कशीही असो, शिक्षण थांबता कामा नये. शिक्षणाचं महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या मुली सर्वांचच लक्ष वेधून घेत आहेत. सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असलेला व्हिडीओ एका बाजारातील आहे.


बाजारात भाज्यांच्या गाड्या लागल्या आहेत आणि महिला भाजी खरेदी करताना दिसत आहेत. याच दरम्यान कॅमेऱ्यात एक दृश्य कैद झालं, ज्यात दोन लहान मुली भाजीच्या गाडीखाली बसून आपला शाळेचा अभ्यास करताना दिसत आहेत. ज्याने कोणी हे दृश्य पाहिले, त्याचे डोळे पाणावले. 'शिकण्याची जिद्द असेल तर मुलं कुठेही शिकू शकतात' याचंच उत्तम उदाहरण या मुलींनी समोर ठेवलं आहे. गरिबीसमोर त्यांनी आपली लेखणी झुकू दिली नाही आणि शिक्षणाची ओढ अशी की भर बाजारात गाडीखाली बसून त्या अभ्यास करत आहेत.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @nimavatnikhil नावाच्या हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. याला १.५ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. इतकेच नाही तर मोठ्या संख्येने युजर्स या मुलींवर प्रेमाचा वर्षाव करत आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. व्हिडीओ पाहून युजर्स भावूक कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिलं, "राजवाड्यात राहूनही काही मुले तक्रारी करत असतात, तर ही गरीब मुलं झोपडीत राहूनही स्वतःचं नशीब घडवत आहेत." अन्य एका युजरने सावध करत लिहिलं, "मेहनत करण्यापासून तर यांना कोणी रोखू शकत नाही, पण गल्लीबोळात फिरणाऱ्या दुष्ट प्रवृत्तींपासून या मुलींना वाचवणंही तितकंच गरजेचं हे."

Web Title : शिक्षा ने गरीबी को हराया: सब्जी ठेले के नीचे पढ़ती लड़कियाँ, प्रेरणादायक।

Web Summary : एक वीडियो में दो लड़कियाँ बाजार में सब्जी के ठेले के नीचे पढ़ाई करती दिख रही हैं, जो गरीबी के बावजूद सीखने के उनके दृढ़ संकल्प को उजागर करता है। उनकी लगन दर्शकों को प्रेरित करती है, यह साबित करते हुए कि शिक्षा कहीं भी फल-फूल सकती है।

Web Title : Education overcomes poverty: Girls study under vegetable cart, inspiring many.

Web Summary : A video shows two girls studying under a vegetable cart in a market, highlighting their determination to learn despite poverty. Their dedication inspires viewers, proving education can thrive anywhere.