Viral Video: पोरीने गाजवली पार्टी... साडी नेसून तरुणीचा अफलातून डान्स, अदांनी केलं घायाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 15:05 IST2025-11-24T15:04:44+5:302025-11-24T15:05:08+5:30
girl dancing in saree viral video: व्हिडीओमधील मुलीचा डान्स आणि तिच्या अदा साऱ्यांचेच लक्ष वेधून घेताना दिसल्या

Viral Video: पोरीने गाजवली पार्टी... साडी नेसून तरुणीचा अफलातून डान्स, अदांनी केलं घायाळ
girl dancing in saree viral video: आजकाल सोशल मीडिया म्हणजे एक विविध कलांसाठीचे व्यासपीठ असते. सोशल मीडियावर नेटकरी आपली कला दाखवतात. दररोज सोशल मीडियावर काही ना काही व्हिडिओ चर्चेचा विषय बनतो. लोक व्हिडीओ पाहतात आणि एकमेकांसोबत शेअरही करतात. एखादा डान्स व्हिडिओ आला तर तो लगेच व्हायरल होतो. असाच एक व्हिडिओ अलिकडे व्हायरल झाला आहे. व्हिडीओमधील मुलीचा डान्स आणि तिच्या अदा साऱ्यांचेच लक्ष वेधून घेताना दिसत आहेत.
या व्हिडीओत एक मुलगी काळी साडी आणि स्लीव्हलेस ब्लाउजमध्ये नाचताना दिसत आहे. मोठ्या आवाजातील डीजे बीट, तिचे हावभाव आणि कॅमेऱ्यात कैद झालेल्या अदा यामुळे तो व्हिडिओ झटपट व्हायरल होताना दिसतोय. या मुलीचा आत्मविश्वास इतका आहे की व्हिडिओ सुरू होताच, ती तिच्या डोळ्यांनी प्रेक्षकांना खेचून घेते. तिच्या चेहऱ्यावरील भाव पाहता ती प्रोफेशनल डान्सरच्या तोडीस तोड डान्स करताना दिसते. पाहा व्हिडीओ-
लोहा पिट लूंगा, पत्थर भी तोड़ दूंगा, धक्के भी खा लूंगा, और बाथरूम मे भी सो लूंगा..
— Mahtab Siddiqui (@Mahtab_Siddiqu1) November 15, 2025
बस आज-आज देख लेने दो,
कल से जो करवाना हो करवा लेना ₹10000 लिया हूँ काम तो करूँगा ही... pic.twitter.com/wvchvWiFj7
सोशल मीडियावर ती मुलगीही व्हायरल झाली आहे. हा व्हिडिओ एका स्थानिक कार्यक्रमात स्टेजवर रेकॉर्ड करण्यात आला आहे. काही जणांचा दावा आहे की हा व्हिडिओ एका नृत्य कार्यक्रमाचा भाग होता, तर काही जण लग्नाच्या कार्यक्रमाचा दावा करतात. सोशल मीडियावरील प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया अधिक मनोरंजक आहेत.