मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 15:00 IST2025-08-07T14:52:26+5:302025-08-07T15:00:56+5:30
Bride Father gets emotional viral video: हा व्हिडीओ पाहून लाखो नेटकऱ्यांचे डोळे पाणावले आहेत...

मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
Bride Father gets emotional viral video: सोशल मीडिया हे एक असे माध्यम आहे, जे तुम्हाला कधी क्षणात रडवते, तर कधी खो-खो हसायला लावते. अवघ्या १५ ते २० सेकंदाच्या व्हिडीओपासून ते अगदी मोठमोठ्या शॉर्ट फिल्मपर्यंत सारेच नेटकऱ्यांना आवडते. अनेकदा सोशल मीडियावरील काही व्हायरल व्हिडीओ आपल्याला भावनिकही करतात. सध्या असाच एक व्हिडीओ चर्चेत आहे. लग्नानंतर वधूच्या निरोपाचा (Dulhan Ki Vidai) क्षण नेहमीच भावनिक असतो. सोशल मीडियावर अशाच एका व्हिडिओने लक्ष वेधले आहे, ज्यामुळे लाखो लोकांचे डोळे पाणावले आहेत.
व्हिडिओमध्ये, एक वडील आपल्या मुलीला निरोप देताना रडत वराला असे काही म्हणतात की तिथे उपस्थित असलेले सर्वांचे डोळे डबडबतात. या दृश्यातून दिसून येते की, सर्वांसमोर स्वतःला मजबूत दाखवण्याचा प्रयत्न करत असतानाही आपल्या मुलीला निरोप देतात वडील किती भावनिक होतात. व्हायरल व्हिडिओमध्ये, आपल्या मुलीला पाठवणी करण्यापूर्वी, तो वधूपिता गहिरवलेल्या स्वरात वराला म्हणतो, 'जर कधी माझ्या मुलीचे काही चुकले, किंवा तुला वाटले की तुला माझ्या मुलीचा राग आला, तर तिला दुखवू नकोस किंवा तिला त्रास देऊ नकोस. तिला माझ्याकडे पाठव. मी तिला समजावेन. आजपासून मी माझ्या प्रिय मुलीला तुझ्या स्वाधीन करत आहे.
Father gets emotional pic.twitter.com/pwYqyklFqT
— Viru B (@ViruB1023220) August 7, 2025
व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की, वडिलांचे हे शब्द ऐकून वरही भावनिक होतो आणि त्यांना आश्वासन देतो की असे कधीही होणार नाही. मी तुमच्या मुलीचा नीट सांभाळ करेन आणि तिला आयुष्यभर साथ देईन. @_nannaku.prematho_ या इन्स्टाग्राम हँडलवरून शेअर केलेला हा व्हिडिओ आहे. तो व्हायरल झाला असून, व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटिझन्स भावुक झाले आहेत. वडिलांच्या निःस्वार्थ प्रेमाचे कौतुक करत आहेत. या व्हिडिओमध्ये वडिलांसाठी मुलगी किती मौल्यवान असते हे दाखवले गेले आहे. या व्हिडिओला लाखो व्ह्यू मिळाले आहेत.