Viral Video : ताडपत्री अन् झावळ्या बघून झोपडी समजलात का? आत वाकून बघाल तर शॉकच व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 15:45 IST2025-06-27T15:42:59+5:302025-06-27T15:45:23+5:30

सध्या सोशल मीडियावर एका झोपडीवजा घराचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे, ज्याने नेटकऱ्यांना आश्चर्यचकित  केले आहे.

Viral Video: Did you think it was a hut just by looking at the tarpaulin and thatch? If you look inside, you'll be shocked! | Viral Video : ताडपत्री अन् झावळ्या बघून झोपडी समजलात का? आत वाकून बघाल तर शॉकच व्हाल!

Viral Video : ताडपत्री अन् झावळ्या बघून झोपडी समजलात का? आत वाकून बघाल तर शॉकच व्हाल!

सध्या सोशल मीडियावर एका झोपडीवजा घराचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे, ज्याने नेटकऱ्यांना आश्चर्यचकित  केले आहे. बाहेरून अत्यंत सामान्य दिसणारे हे घर आतून पाहिले असता, त्यात श्रीमंतांच्या घरात असणाऱ्या सर्व सोयीसुविधा पाहून लोक थक्क झाले आहेत. हा व्हिडिओ अनेकांना 'अशी गरिबी आम्हालाही मिळू दे' असे म्हणायला लावत आहे.

अनोखा जुगाड!
आजकाल सोशल मीडियावर आपल्याला विविध प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतात, ज्यात जुगाड ते विनोदी अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो. असाच एक आगळावेगळा व्हिडिओ सध्या समोर आला आहे. बाहेरून साधीसुधी झोपडी दिसत असली तरी, कॅमेरा आत गेल्यावर जे दृश्य दिसते, ते पाहून सारेच अचंबित झाले आहेत. या घरात एसी, मिनी फ्रिज आणि टीव्ही यांसारख्या आधुनिक वस्तू दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहून काही जणांनी तर या व्यक्तीला 'प्रोफेशनल गरीब' असेही संबोधले आहे.

कोणत्याही गोष्टीला केवळ वरवर पाहून लगेच निष्कर्ष काढू नये, कारण काही गोष्टी दिसतात तशा नसतात. या म्हणीचे हे जीवंत उदाहरण आहे. बाहेरून अगदी सामान्य वाटणाऱ्या या घरात आत गेल्यावर तुम्हाला आश्चर्यकारक गोष्टी दिसतील. हे दृश्य पाहून तुमचेही डोळे पांढरे होतील.

पाहा व्हिडिओ : 



या व्हिडिओमध्ये एक झोपडी दिसत आहे, तर आजूबाजूला हिरवीगार झाडे दिसत आहेत आणि घराबाहेर एक एसी युनिट ठेवलेले आहे. त्यानंतर जेव्हा कॅमेरा घरात प्रवेश करतो, तेव्हा आतील दृश्य खरोखरच धक्कादायक दिसते. या झोपडीच्या आत एसी, मिनी फ्रिज आणि टीव्ही बसवलेला आहे आणि एक व्यक्ती आरामात पलंगावर झोपून टीव्ही पाहताना दिसत आहे. बाहेरून साधी दिसणारी झोपडी आतून पूर्णपणे ऐषोआरामात नटलेली आहे. म्हणूनच हा व्हिडिओ लोकांमध्ये तुफान व्हायरल होत आहे आणि तो पाहिल्यानंतर लोक 'अशी गरिबी देवाला सगळ्यांना देवो!' असे म्हणत आहेत.

सोशल मीडियावर धुमाकूळ!
हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर 'theindiancasm' नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो लोकांनी लाईक केले असून, लाखो लोकांनी तो पाहिला आहे. यासोबतच लोक यावर कमेंट्स करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युझरने लिहिले आहे की, "हा माणूस किती जबरदस्त गरिबीत जगत आहे!" तर दुसऱ्याने म्हटले की, "या पातळीची गरिबी देवाने प्रत्येकाला द्यावी!" आणखी एका युझरने कमेंट केली आहे की, "बाहेरून झोपडी, आतून पूर्ण राजवाडा आहे रे बाबा!"

Web Title: Viral Video: Did you think it was a hut just by looking at the tarpaulin and thatch? If you look inside, you'll be shocked!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.