VIDEO : कॅमेराकडे डोळे फाडून बघत होती नवरी, घाबरले पाहुणे; यूजर्स म्हणाले - ही तर मंजुलिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 16:28 IST2022-05-25T16:26:17+5:302022-05-25T16:28:10+5:30
Funny Viral Video : व्हायरल झालेल्या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, नवरी-नवरदेव हार टाकत आहेत. आजूबाजूला घरातील लोक आणि पाहुणे आहेत.

VIDEO : कॅमेराकडे डोळे फाडून बघत होती नवरी, घाबरले पाहुणे; यूजर्स म्हणाले - ही तर मंजुलिका
Funny Viral Video : सोशल मीडियावर लग्नाचे कितीतरी व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी नवरी रागात मिठाई खात नाही तर कधी नवरदेव पाहुण्यांवर मिठाई फेकतो. असे बरेच मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर रोज बघायला मिळतात. असाच एक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ज्यात रितीरिवाज सुरू असताना नवरीने असं काही केलं की, लोक तिला बघून घाबरले. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हीही पोट धरून हसाल.
व्हायरल झालेल्या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, नवरी-नवरदेव हार टाकत आहेत. आजूबाजूला घरातील लोक आणि पाहुणे आहेत. अशात कॅमेरामन नवरी-नवरदेवाचे फोटो काढत आहेत. पण जर तुम्ही व्हिडीओ जरा बारकाईने बघितला तर लक्षात येईल की, नवरी कॅमेरामनला फारच रागाने बघत आहे. ती कॅमेरामनकडे डोळे फाडून बघत आहे. असं वाटत आहे की, जणू ती कुणालातरी घाबरवत आहे.
हा व्हिडीओ लोकांना फारच मजेदार वाटत आहे आणि लोक हा व्हिडीओ शेअरही करत आहेत. सोबतच यावर अनेक मजेदार कमेंट्सही करत आहेत. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर gieddee नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. एका यूजरने तर म्हटलं की, ही तर मंजुलिका आहे. तर दुसरा म्हणाला की, आता बिचाऱ्या नवरदेवाचं काय होणार?