इश्श्श्श! नवरीने मोठ्या उत्साहाने स्टेजवरच उघडलं लग्नाचं गिफ्ट, बघून इतकी लाजली की.....
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2021 16:07 IST2021-07-10T16:06:14+5:302021-07-10T16:07:01+5:30
सगळे लोक हे जाणून घेण्यास उत्सुक आहेत की, अखेर त्या गिफ्ट बॉक्समध्ये असं काय होतं की, नवरी इतकी लाजली.

इश्श्श्श! नवरीने मोठ्या उत्साहाने स्टेजवरच उघडलं लग्नाचं गिफ्ट, बघून इतकी लाजली की.....
सोशल मीडियावर अलिकडे लग्नातील व्हिडीओ बरेच ट्रेंड होत आहेत. आजकाल बदलत्या काळासोबत लग्नातील वातवरणही बरंच बदललं आहे. अशात इन्स्टाग्रामवर स्टेजवर बसलेल्या नवरी-नवरदेवाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आता नवरी आधीसारख्या मान खाली घालून बसत नाहीत. त्या बिनधास्त असतात. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुमचा विश्वास बसेल.
इन्स्टाग्रामवर निरंजन महापात्र नावाच्या व्यक्तीने लग्नातील एक मजेदार व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत नवरी-नवरदेव स्टेजवर बसलेले आहेत. तेव्हाच स्टेजवर आलेला एक पाहुणा नवरीला गिफ्ट बॉक्स देतो. नवरी जराही वेळ न घातवता तो गिफ्टचा बॉक्स उघडून त्यात काय आहे चेक करते. (हे पण बघा : बाबो! नवऱ्याने एंट्री करतचा नवरीला सर्वांसमोर केले किस, बघतच राहिले वऱ्हाडी)
नवरी उत्साहाने गिफ्ट बॉक्स उघडत असते आणि बाजूला बसलेला नवरदेव हसत आहे. तेव्हाच नवरी बॉक्सचा एक कोपरा वर करून त्यात काय आहे हे बघते. त्यात जे दिसतं ते पाहून नवरी लाजू लागते. थोडसं हसून ती गिफ्ट बॉक्स बाजूला करते. इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ रील्स म्हणून अपलोड केला आहे.
या व्हिडीओला आतापर्यंत १० हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. सगळे लोक हे जाणून घेण्यास उत्सुक आहेत की, अखेर त्या गिफ्ट बॉक्समध्ये असं काय होतं की, नवरी इतकी लाजली. असं काय होतं की, ते पाहून तिच्या चेहऱ्याचा रंगच बदलला.