VIDEO : दुकानात आरामात बसला होता तरूण, अचानक उंदरामागे सरपटत आला कोब्रा साप आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2021 12:07 IST2021-09-11T12:04:21+5:302021-09-11T12:07:48+5:30

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये बघू शकता की, तरूण धोकादायक स्थितीत अडकला असता.

Viral video of boy was busy in mobile at shop suddenly came the cobra snake and then it happened | VIDEO : दुकानात आरामात बसला होता तरूण, अचानक उंदरामागे सरपटत आला कोब्रा साप आणि...

VIDEO : दुकानात आरामात बसला होता तरूण, अचानक उंदरामागे सरपटत आला कोब्रा साप आणि...

पान टपरीवर बसलेला एक तरूणाचा आश्चर्यकारकपणे जीव वाचला. एका विषारी लांबलचक कोब्रा साप उंदरामागे धावत होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओत एक तरूण आपल्या स्मार्टफोनवर बिझी होता. जसा तो बसणार त्याला जाणीव झाली की, दुकानात काहीतरी गडबड आहे. जसा तो दुकानाच्या बाहेर गेला काही सेकंदात एका उंदरामागे एक साप येताना दिसला.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये बघू शकता की, तरूण धोकादायक स्थितीत अडकला असता. तरूणाला हे माहीत नव्हतं की,  दुकानातील उंदरामागे साप लागला आहे. त्याने जराही उशीर केला असता तर कदाचित त्याची जीवही जाऊ शकला असता. मात्र, सुदैवाने त्याला काही गडबड असल्याची जाणीव झाली आणि तो दुकानातून पळून गेला. (हे पण वाचा : शेपटीवरून सापाच्या ताकदीचा अंदाज बांधू नका, नाहीतर....!; थरकाप उडवणारा Video)

हा व्हिडीओत भाजपाचे एक नेता हितानंद शर्मा यांनी ट्विटरवर पोस्ट केलाय. शर्मा यांनी पोस्टमध्ये लिहिलं की, 'जाको राखे साईंया मार सके ना कोय! मध्य प्रदेशच्या रायसेन जिल्ह्यातील हा व्हिडीओ आहे. ज्यात एका उंदीर आणि सापाच्या धरपकडीत एक तरूण वाचला'. ट्विटर यूजरनुसार हा व्हिडी मध्य प्रदेशच्या रायसेन जिल्ह्यातील आहे. व्हिडीओ सोशल मीडियावरील वेगवेगळ्या अकाउंटवर शेअऱ करण्यात आला आहे.
 

Web Title: Viral video of boy was busy in mobile at shop suddenly came the cobra snake and then it happened