VIDEO : लग्नात स्टेजवर येऊन नवरीसमोर नाचला तरूण, पण काहीच न करता भाव नवरदेव खाऊन गेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2021 11:48 IST2021-09-09T11:43:52+5:302021-09-09T11:48:18+5:30

नवरी-नवरदेव स्टेजवर उभे आहेत आणि तेव्हाच एक तरूण स्टेजवर येतो आणि डान्स करू लागतो. त्याचा डान्स बघून पाहुणे लगेच त्याचा डान्स फोनमध्ये रेकॉर्ड करू लागतात.

Viral video of boy did sallu bhai style dance in front of the bride groom kept watching | VIDEO : लग्नात स्टेजवर येऊन नवरीसमोर नाचला तरूण, पण काहीच न करता भाव नवरदेव खाऊन गेला

VIDEO : लग्नात स्टेजवर येऊन नवरीसमोर नाचला तरूण, पण काहीच न करता भाव नवरदेव खाऊन गेला

सोशल मीडियावर तसे तर लग्नाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण सध्या जो व्हिडीओ व्हायरल झालाय तो भन्नाट आहे. यात नवरी-नवरदेव स्टेजवर उभे आहेत आणि तेव्हाच एक तरूण स्टेजवर येतो आणि डान्स करू लागतो. त्याचा डान्स बघून पाहुणे लगेच त्याचा डान्स फोनमध्ये रेकॉर्ड करू लागतात. पण यात तरूणाच्या डान्सपेक्षा नवरदेवाचे न दिलेले एक्सप्रेशन भाव खाऊन गेले आहेत. 

नवरी-नवरदेव स्टेजवर असताना अचानक स्टेजवर येऊन एखाद्याने डान्स सुरू केला तर कुणीही हैराण होईल. असंच काहीसं रेडिटवर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत बघायला मिळतं. हा तरूण येतो आणि सलमान खान, शाहरूख खान आणि माधुरी दीक्षितच्या फेमस 'तारों सा चमकता चेहरा हो...' गाण्यावर डान्स करू लागतो. (हे पण बघा : VIDEO : कचरेवाला रॉक्स! लहान मुलाचा गेला असता जीव, जर कचरेवाल्याने दाखवली नसती चपळता..)

हा व्हिडीओ पाहून एका यूजरने लिहिलं की, 'हा व्हिडीओ पाहून मला जुन्या सिनेमांची आठवण येत आहे. ज्यात हिरोईन दुसऱ्याच मुलासोबत लग्न करतो आणि हिरो पार्टीत येऊन गाणं गातो, 'तू प्यार है किसी और का...'. तेच एका दुसऱ्या यूजरने लिहिलं की, 'यांना वाटतं की स्टेजवर नाचलं तर कूल वाटेल, पण असं अजिबात नाहीये'. रेडिटवर या व्हिडीओला ५ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओवर लोक भरभरून कमेंट्सही करत आहेत.
 

Web Title: Viral video of boy did sallu bhai style dance in front of the bride groom kept watching