Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 19:20 IST2025-06-21T19:18:21+5:302025-06-21T19:20:47+5:30
एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यात एका महिलेने रील बनवण्यासाठी असे काही केले, की ज्याबद्दल कोणी विचारही केला नसेल.

Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
सध्या सोशल मीडियावर प्रत्येकाला लाईक्स आणि व्ह्यूजची भूक लागली आहे. प्रत्येकालाच व्हायरल होण्याची घाई झाली आहे, यासाठी लोक काहीही करायला तयार झाले आहेत. या स्पर्धेत लोक इतके गुरफटले आहेत की, त्यांना काय चांगले आणि काय वाईट हे दिसत नाही. अनेक वेळा तर असेही दिसून येते की, या नादात लोक स्वतःचे मोठे नुकसान करून घेतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यात एका महिलेने रील बनवण्यासाठी असे काही केले, की ज्याबद्दल कोणी विचारही केला नसेल. महिलेच्या या अजब कृतीमुळे तिचा व्हिडीओ व्हायरल झाला खरा, पण लोकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
जर कोणाला आपल्या व्हिडीओसाठी लाईक्स आणि व्ह्यूज मिळवायचे असतील, तर त्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे डान्सशी संबंधित व्हिडीओ बनवणे. पण, आता यापेक्षा थोडे वेगळे काही करण्याच्या नादात लोक अनेकदा काहीतरी विचित्र करून जातात. आता व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये महिलेने स्वतःला वेगळे दाखवण्यासाठी आणि व्हायरल होण्यासाठी चक्क बेडकांचा वापर केला आणि व्हिडीओ रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली.
गळ्यात बेडकांचा हार आणि डोक्यावरही एक!
व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एका महिलेने आपल्या गळ्यात बेडकांना एखाद्या हाराप्रमाणे लटकवले आहे. याशिवाय, तिने आपल्या डोक्यावरही एक बेडूक बसवून ठेवला आहे. व्हिडीओ इथेच संपत नाही, तर ही महिला बेडकांना घेऊन नाचायला सुरुवात करते. तिचा डान्स फारसा चांगला नसला तरी, या महिलेच्या या विचित्र कृतीमुळे तिचा व्हिडीओ लोकांमध्ये वेगाने व्हायरल होत आहे. लोक तो फक्त पाहतच नाहीत, तर मोठ्या प्रमाणात शेअरही करत आहेत.
नेटकऱ्यांकडून जोरदार ट्रोलिंग!
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर 'soo_funny_memes' नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला हजारो लोकांनी लाईक केले असून, लाखो लोकांनी तो पाहिला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक त्यावर मजेशीर कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिले की, 'याच कारणामुळे लोक लाईक्स आणि व्ह्यूजच्या नादात वेडे झाले आहेत.' तर दुसऱ्याने लिहिले की, 'अशा कृतीमुळे निश्चितच संपूर्ण बेडूक समाज घाबरला असेल.' आणखी एकाने लिहिले की, 'ही तर पूर्णपणे बेडकांची महाराणी वाटत आहे.'