VIDEO: 'बीडी जलै ले...'वर वधू-वराचा भन्नाट डान्स, वऱ्हाड्यांनी केला शिट्ट्या-टाळ्यांचा जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 14:21 IST2025-02-26T14:20:04+5:302025-02-26T14:21:07+5:30

Bride Groom Viral Dance Video: लग्न असो किंवा इतर कोणतंही फंक्शन असो, डान्सचा तडका लागल्यावर वातावरण एकदम उत्साही होऊन जातं

viral video american groom dances on bollywood song with indian bride whistlin claps all over trending | VIDEO: 'बीडी जलै ले...'वर वधू-वराचा भन्नाट डान्स, वऱ्हाड्यांनी केला शिट्ट्या-टाळ्यांचा जल्लोष

VIDEO: 'बीडी जलै ले...'वर वधू-वराचा भन्नाट डान्स, वऱ्हाड्यांनी केला शिट्ट्या-टाळ्यांचा जल्लोष

Bride Groom Viral Dance Video: लग्न असो किंवा इतर कोणतं फॅमिली फंक्शन असो, त्या कार्यक्रमात डान्सचा तडका लागल्यावर वातावरण एकदम दुप्पट उत्साही होऊन जाते. विशेषत: जेव्हा बॉलीवूड गाण्यांचे देसी बीट्स वाजवले जातात, तेव्हा केवळ भारतीयच नाही तर परदेशी पाहुणे देखील त्यावर ठेका धरू लागतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. व्हिडीओमध्ये एक परदेशी नवरदेव आपल्या जबरदस्त डान्सने सर्वांची वाहवा मिळवताना दिसतोय.

इंटरनेटवर ज्या विदेशी तरूणाचा डान्स व्हायरल झालाय तो तरूण अमेरिकन आहे. त्याचे नाव तरण नोल्स असे असून तो भारतीय वधू ऐश्वर्या देशपांडे हिच्यासोबत 'बिडी जलै ले' या गाण्यावर नाचताना दिसत आहे. हा व्हिडिओ त्याच्या संगीत समारंभातील आहे, जिथे तरणने पारंपारिक भारतीय पोशाखात आपल्या दमदार डान्सने साऱ्यांनाच थक्क केले आहे. अभारतीय असूनही त्याने बॉलिवूड गाण्यावर केलेल्या डान्स स्टेप्स साऱ्यांचेच लक्ष वेधून घेत आहेत. वधू ऐश्वर्याने पोस्ट केलेला हा व्हिडिओ काही क्षणातच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पाहा व्हिडीओ-


ऐश्वर्याने व्हिडीओ पोस्ट करत लिहिले आहे की, पहिल्यांदा जेव्हा तरणने बॉलिवूड गाणी ऐकली तेव्हा तो भारावून गेला. त्यातही बीडी जलै ले हे गाणं त्याला खूपच भावलं. मी प्रोफेशनल डान्सर आहे आणि तरणला अजिबात डान्स येत नाही. पण त्याने म्युझिक व्हिडीओ पाहून स्वत: डान्स बसवला आणि त्याने संपूर्ण शो जिंकला. या डान्सची कोरिओग्राफी ऐश्वर्याने केलीय, असेही तिने कॅप्शन मध्ये लिहिले आहे.

Web Title: viral video american groom dances on bollywood song with indian bride whistlin claps all over trending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.