Viral Story: ‘वर्क फ्रॉम होम’मुळे वाचले लग्न! एका व्यक्तीने सोशल मीडियावर सांगितली कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 16:01 IST2025-11-27T16:01:15+5:302025-11-27T16:01:44+5:30
'वर्क फ्रॉम होम'संस्कृतीने केवळ कामाच्या पद्धती बदलल्या नाहीत, तर लोकांचे वैयक्तिक आयुष्यही सुधारले आहे. याचेच एक बोलके उदाहरण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Viral Story: ‘वर्क फ्रॉम होम’मुळे वाचले लग्न! एका व्यक्तीने सोशल मीडियावर सांगितली कहाणी
कोरोना महामारीनंतर 'वर्क फ्रॉम होम'संस्कृतीने केवळ कामाच्या पद्धती बदलल्या नाहीत, तर लोकांचे वैयक्तिक आयुष्यही सुधारले आहे. याचेच एक बोलके उदाहरण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका व्यक्तीने 'रेडिट' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपली कहाणी शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याने सांगितले की, 'वर्क फ्रॉम होम'मुळे त्याचा तुटलेला संसार पुन्हा जुळला आणि त्याचे वैवाहिक आयुष्य सुधारले.
दिल्लीत वाढत्या प्रदूषणामुळे नुकताच सरकारने वर्क फ्रॉम होमचा आदेश दिला असतानाच, या सुविधेचा एक अनोखा फायदा समोर आला आहे. कामामुळे पत्नीला पुरेसा वेळ देऊ शकत नसल्यामुळे या जोडप्यात मोठी दरी निर्माण झाली होती. मात्र, जेव्हा त्याला घरातून काम करण्याची संधी मिळाली, तेव्हा तो पत्नीसोबत अधिक वेळ घालवू शकला. या बदलामुळे त्यांच्या नात्यातील दुरावा हळूहळू संपला आणि त्यांचे नाते हळूहळू पूर्ववत झाले.
आता पत्नीसोबत जास्त वेळ मिळतो!
या व्यक्तीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, "जेव्हा लोक घरातून काम करण्याबद्दल बोलतात, तेव्हा ते सहसा झोप किंवा प्रवासाचा वेळ वाचल्याचे सांगतात. पण माझ्यासाठी सर्वात मोठा बदल हा आहे की, आता मी माझ्या पत्नीसोबत किती जास्त वेळ घालवू शकतो."
त्याने कोविड-पूर्व जीवनाबद्दल बोलताना म्हटले की, "कोरोना पूर्वी मी तिच्या झोपेतून उठण्याआधीच घर सोडायचो आणि रात्री ७ किंवा ८ वाजता थकून घरी यायचो. आम्ही फक्त रात्रीचे जेवण एकत्र करायचो आणि अर्धवट झोपेत नेटफ्लिक्स पाहायचो. आमचं नातं केवळ वीकेंड पुरतं मर्यादित झालं होतं."
घरून कामामुळे आयुष्य बदलले!
आता वर्क फ्रॉम होममुळे परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. त्याने लिहिले की, "आता कामावर पोहोचणे म्हणजे बेडरूममधून लिव्हिंग रूममधील कोपऱ्यात ठेवलेल्या टेबलापर्यंतचे फक्त १२ पाऊले इतकेच आहे. आम्ही एक छोटी सवय लावली आहे की, दिवसाची सुरुवात सोबत कॉफी पिऊन करतो. आम्ही कॉफी संपवल्याशिवाय मी माझा लॅपटॉप उघडत नाही."
इतकंच नाही, तर दुपारच्या जेवणासाठी तो अर्धा तासाचा ब्रेक घेतो आणि जेवण दोघे मिळून तयार करतात. यामुळे आपले नाते फक्त वीकेंडपुरते मर्यादित न राहता, पुन्हा दैनंदिन जीवनाचा भाग बनले, असे या व्यक्तीने म्हटले आहे.
कामाचा परफॉर्मन्सही सुधारला!
'वर्क फ्रॉम होम'मुळे परफॉर्मन्सवरही परिणाम होतो, असा गैरसमज अनेकदा असतो. मात्र, या व्यक्तीने म्हटले की, "मजेदार गोष्ट म्हणजे, कामावरील माझा परफॉर्मेंस कमी नाही झाला, तर सुधारला आहे. कारण आता मी कामाला बसतो, तेव्हा चिडचिडा किंवा थकलेला नसतो."
वाचकांनीही केले कौतुक
ही पोस्ट व्हायरल झाल्यावर अनेक युजर्सनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या. एका युजरने लिहिले, "छोटे-छोटे क्षण एकमेकांसोबत घालवल्याने अशा गोष्टी दुरुस्त होऊ शकतात, ज्या बिघडत आहेत याची तुम्हाला कल्पनाही नव्हती." तर दुसऱ्या एका युजरने म्हटले, "कर्मचाऱ्यांसाठी रिमोट वर्क हा सर्वोत्तम पर्याय आहे. आम्ही कामावर लक्ष केंद्रित करू शकतो आणि सोबतच प्रियजनांसोबत कॉफी ब्रेकचा आनंद घेऊ शकतो. आयुष्य असेच असायला हवे."