फेमस ब्रॅन्डने मार्केटमध्ये आणलं नवं फाटकं स्वेटर, किंमत वाचून चक्रावले लोक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 19:41 IST2021-08-28T19:40:16+5:302021-08-28T19:41:57+5:30
सोशल मीडियावर नेहमीच अजब गोष्टी व्हायरल होत असतात. फॉरेनमध्ये प्रसिद्ध लक्झरी ब्रॅन्डने हायफाय रेंजचं स्वेटर मार्केटमध्ये लॉंच केलं आहे.

फेमस ब्रॅन्डने मार्केटमध्ये आणलं नवं फाटकं स्वेटर, किंमत वाचून चक्रावले लोक
फॅशन बदलायला जास्त वेळ लागत नाही. आजकाल मार्केटमध्ये अनेकप्रकारचे ब्रॅन्ड आहेत. अनेक ब्रॅन्ड्सनी फॅशन इंडस्ट्रीत आपली जागा निर्माण केली आहे. अलिकडे फॅशन ट्रेंडमध्ये डिस्ट्रेस्ड कपड्यांचं फारच चलन वाढलं आहे. डिस्ट्रेस्ड म्हणजे कपडे कुठूनतरी फाटलेले किंवा बेरंगी असतात. नुकतंच एका प्रसिद्ध लक्झरी ब्रॅन्डने एक स्वेटर लॉंच केलं आहे. ज्याची किंमत पाहून लोक हैराण झाले आहेत.
सोशल मीडियावर नेहमीच अजब गोष्टी व्हायरल होत असतात. फॉरेनमध्ये प्रसिद्ध लक्झरी ब्रॅन्डने हायफाय रेंजचं स्वेटर मार्केटमध्ये लॉंच केलं आहे. फॅशन फॉलो करणारे लोकही ह स्वेटर पाहून हैराण झाले आहेत. कारण या स्वेटरची किंमत १ हजार ४५० डॉलर ठेवण्यात आली आहे. भारतीय करन्सीनुसार ही किंमत १ लाख रूपये इतकी होते. पण या स्वेटरची चर्चा रंगलीये कारण ते फाटलेलं आहे.
People are literally paying $1,450 for a destroyed Balenciaga sweater. Recession indicator 🤣 pic.twitter.com/lqYeYOaMlt
— Dom (@DomAesthetics) August 26, 2021
हे स्वेटर ब्रॅन्डच्या डिस्ट्रेस्ड क्लोदिंग लाइनचा भाग आहे. या स्वेटरला डिस्ट्रेस्ड लूक देण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी फाडलं आहे. कॉलर आणि बाह्यांवर डिझाइन बघता येते. सोशल मीडिया यूजर्स या डिझाइनची खिल्ली उडवत आहेत. लोक म्हणत आहेत की, स्वेटर पाहिल्यावर असं वाटतं जणू ते उंदराने कुरतडलंय.