VIRAL : भीती नाही, थरार! एका व्यक्तीने १००हून अधिक विषारी सापांचा वाचवला जीव; Video पाहून नेटकरी हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 10:12 IST2025-10-20T10:11:22+5:302025-10-20T10:12:18+5:30
साप म्हटलं की अनेकांच्या अंगावर काटा येतो आणि लोक लगेच दूर पळतात. पण सध्या सोशल मीडियावर एका व्यक्तीचा थरारक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

VIRAL : भीती नाही, थरार! एका व्यक्तीने १००हून अधिक विषारी सापांचा वाचवला जीव; Video पाहून नेटकरी हैराण
साप म्हटलं की अनेकांच्या अंगावर काटा येतो आणि लोक लगेच दूर पळतात. पण सध्या सोशल मीडियावर एका व्यक्तीचा थरारक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे, ज्याने १०० हून अधिक विषारी सापांना जीवदान दिले आहे. समुद्राच्या किनाऱ्यावर येऊन पडलेल्या या सापांना वाचवण्यासाठी त्याने जी हिंमत दाखवली आहे, त्यामुळे लोक त्याला 'सुपरहिरो' म्हणत आहेत. हा व्हिडीओ ९० लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.
काय आहे व्हायरल व्हिडीओमध्ये?
सोशल मीडियावर व्हायरल होणार हा धक्कादायक व्हिडीओ इंस्टाग्रामवर 'nomad_bogati' नावाच्या आयडीवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती समुद्राच्या किनाऱ्यावर येऊन पडलेले साप दाखवत आहे. प्रथमदर्शनी ते मासे असल्याचा भास होतो, पण जेव्हा ही व्यक्ती त्यांना हात लावते, तेव्हा ते विषारी साप असल्याचे स्पष्ट होते. मात्र, हा व्यक्ती जराही न घाबरता, कसलीही सुरक्षा साधने न वापरता, एक-एक करून या सर्व सापांना एका टोपलीत जमा करतो. त्यानंतर ती टोपली घेऊन तो थेट समुद्रात जातो आणि सर्व सापांना पुन्हा पाण्यात सोडून देतो.
एका क्षणाचाही नाही भीती
या व्यक्तीची हिंमत पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. साप पकडताना त्याच्या चेहऱ्यावर ना भीती दिसते, ना घाबरल्याचे कोणतेही लक्षण. या व्हिडीओमध्ये दावा करण्यात आला आहे की, या अवलिया व्यक्तीने अशाप्रकारे १०० हून अधिक विषारी सापांचे प्राण वाचवले आहेत. मात्र, काही युजर्सला हा व्हिडीओ 'एआय' तंत्रज्ञानाने बनवलेला वाटत आहे.
या व्हिडीओला आत्तापर्यंत ९० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून, ६५ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. एका युजरने या व्हिडीओवर कमेंट करत लिहिले की, 'भाई तू माणूस नाही, सुपरहिरो आहेस!' तर दुसऱ्याने 'जिथे आम्ही भीतीने पळतो, तिथे हा माणूस सापांना वाचवतोय. अशा लोकांना सलाम!' असे म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. एका युजरने 'माणुसकी अजून जिवंत आहे हे पाहून आनंद झाला' असेही म्हटले आहे.